शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

राष्ट्रीय मतदार दिन साजरा; वर्षात २८ हजार मतदार वाढले, ई ईपीक प्रणाली कार्यान्वित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 00:46 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावून नवभारत घडविण्यासाठी मतदारांनी मतदानास पुढे यावे, असे आवाहन केले.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या सव्वा वर्षात २८ हजार ८६३ इतके मतदार वाढले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांची आकडेवारी ३० लाख ९३ हजार ४३ इतकी होती. 

वर्षभरात ही संख्या ३१ लाख २१ हजार ९०६ इतकी झाली आहे. यात १६ लाख ५३८ पुरुष तर १५ लाख २१ हजार २९० महिला आहेत. निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून ई ईपीक प्रणाली कार्यान्वित केली आहे. याअंतर्गत मतदार यादीत मतदारांच्या नावापुढे त्यांचा मोबाइल नंबर असल्यास त्यांना ई-मतदार ओळखपत्र मोबाइलवर डाऊनलोड करता येईल व ते मतदानासाठी ग्राह्य धरले जाईल.

यावेळी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शीतल मुळे-भांबरे, शाहीर आझाद नायकवडी यांच्यासह अधिकारी-कर्मचारी व नवमतदार उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना शपथ दिली.डॉ. बलकवडे यांनी लोकशाहीने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे, असे आवाहन केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी प्रास्ताविक केले. दिव्यांग मतदार, नवमतदारांना मतदान ओळखपत्र मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ब्रेल लिपी, निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. निवडणूक साक्षरतेमध्ये उल्‍लेखनीय काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

मतदानात कोल्हापूर अग्रेसरजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावून नवभारत घडविण्यासाठी मतदारांनी मतदानास पुढे यावे, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी लोकसभा, विधानसभा, पदवीधरच्या निवडणुका असोत किंवा ग्रामपंचायत सर्वच निवडणुकांमध्ये मतदानात कोल्हापूर अग्रेसर असल्याचे गौरवोद्‌गार काढले.

टॅग्स :Votingमतदान