शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शहरात राष्ट्रीय मतदार दिनानिमत्त रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 16:13 IST

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने शनिवारी शहरातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत विद्यार्थी, शिक्षक, तसेच महापालिका कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.

ठळक मुद्देशहरात राष्ट्रीय मतदार दिनानिमत्त रॅलीविद्यार्थी, शिक्षक, महापालिका कर्मचाऱ्यांनी घेतला भाग

कोल्हापूर : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने शनिवारी शहरातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत विद्यार्थी, शिक्षक, तसेच महापालिका कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.बिंदू चौकात नेहरू युवा केंद्राच्या मुलांनी पथनाटय सादर केले. त्यानंतर महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते रॅलीची सुरुवात झाली. रॅली छ. शिवाजी पुतळा, महानगरपालिका, सी. पी. आर. या मार्गावरून दसरा चौक येथे नेण्यात आली.

रॅलीतील सर्वांकडे मतदानाविषयी विविध घोषवाक्यांचे फलक होते. तसेच रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांनी सक्षम करूया युवा व भावी मतदार, मतदार राजा जागा हो-लोकशाहीचा धागा हो, लोकशाही बळकटीकरणासाठी सर्वांचा सहभाग, एकच लक्ष मताचा हक्क, अशा विविध घोषणा देऊन याविषयी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.रॅलीमध्ये उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, करवीरचे तहसीलदार शीतल मुळे, निवडणूक समन्वयक संजय कुंभार, गणेश आवळे, प्रभारी उपायुक्त धनंजय आंधळे, नगरसचिव दिवाकर कारंडे, शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी शंकर यादव यांच्यासह महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालयाकडील कर्मचारी, एन.सी.सी., एन. एस. एस.चे छात्र, शिवाजी विद्यापीठ, केएमसी कॉलेज, न्यु कॉलेज, डी. डी. शिंदे कॉलेज, राजाराम कॉलेज, मेन राजाराम हायस्कूलचे विद्यार्थी, विद्यार्थिंनी, बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.-------------------------------------------------------------------फोटो क्रमांक - २५०१२०२०-कोल-केएमसी - व्होटर रॅलीओळ - कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यावतीने शनिवारी मतदार दिनानिमित्त रॅली काढण्यात आली. या रॅलीत महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी सहभागी झाले.

 

टॅग्स :Votingमतदानcollectorजिल्हाधिकारीMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर