नरेवाडीकरांची नव्यांना पसंती.. जुन्यांना विश्रांती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:05 IST2021-02-05T07:05:54+5:302021-02-05T07:05:54+5:30
विरोधी ज्येष्ठाच्या गटाला केवळ एकच जागा मिळाली आहे. यापूर्वी युवा महापरिवर्तन पॅनलच्या सविता मधुकर सुतार बिनविरोध निवडून आल्याने संख्याबळ ...

नरेवाडीकरांची नव्यांना पसंती.. जुन्यांना विश्रांती!
विरोधी ज्येष्ठाच्या गटाला केवळ एकच जागा मिळाली आहे. यापूर्वी युवा महापरिवर्तन पॅनलच्या सविता मधुकर सुतार बिनविरोध निवडून आल्याने संख्याबळ ८-१ असे झाले आहे. पोरांनी निवडणुकीत चुरस निर्माण केल्याने १३९८ पैकी १०३३ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. विद्यमान सरपंच चंदाबाई निलवे यांनी ही निवडणूक अपक्ष लढवली होती. त्यांना केवळ १४ मते मिळाली.
प्रभाग १ मध्ये दोन्ही गटाचे पॅनलप्रमुखांनी एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवली. यामध्ये अंकुश रणदिवे या २३ वर्षीय युवकाने विरोधी पॅनलप्रमुख साम्बाजाई पाटील यांचा ११४ मतांनी पराभव केला.
नूतन सदस्यांमध्ये अंकुश रणदिवे, सचिन पाटील, कल्पना बिरंजे, अर्चना पाटील, प्रकाश सुतार, नीता कदम, मानसी कदम, आप्पा निलवे यांचा समावेश आहे. --------------------------
* अंकुश रणदिवे : २४०१२०२१-गड-०६