शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

शेखरच्या जगण्याला नाना पाटेकर, मकरंद अनासपुरेंचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 12:39 PM

lockdawun, kolhapur, nana patekar, makrandanaspure शेखर कुलकर्णी. एका खासगी कंपनीत नोकरी. लॉकडाउनच्या काळात त्यांना घरात अपघात झाला. एक ऑपरेशन झाले. दुसऱ्या ऑपरेशनसाठी पैसे नव्हते. मात्र ख्यातनाम अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबतचा शेखर यांचा फोटो आणि त्यांची व्यथा सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्याची दखल घेत नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम संस्थेनं शेखर यांना मदतीचा हात दिला.

ठळक मुद्देशेखरच्या जगण्याला नाना पाटेकर, मकरंद अनासपुरेंचा आधारशस्त्रक्रियेचा उचलला भार, समाजमन,सावलीचे सहकार्य

कोल्हापूर : शेखर कुलकर्णी. एका खासगी कंपनीत नोकरी. लॉकडाउनच्या काळात त्यांना घरात अपघात झाला. एक ऑपरेशन झाले. दुसऱ्या ऑपरेशनसाठी पैसे नव्हते. मात्र ख्यातनाम अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबतचा शेखर यांचा फोटो आणि त्यांची व्यथा सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्याची दखल घेत नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम संस्थेनं शेखर यांना मदतीचा हात दिला.सोशल मीडियाचा वापर किती विधायक पद्धतीनं होऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण. शेखर आणि त्यांची आई जरगनगरमध्ये राहतात. शेखर कोल्हापुरातील एका उद्योगपतींकडे नोकरीला होते. लॉकडाऊनमुळे काळात घराबाहेरील लोखंडी जिन्यावरून तोल जाऊन ते खाली पडले. डोक्‍याला गंभीर इजा झाली. एक पाय आणि एक हात लुळा पडला होता. धड बोलताही येत नव्हते. अंथरुणालाच खिळून. परिस्थिती अगदी बिकट बनली.छत्रपती शहाजी कॉलेजचे प्रा. एम. टी. पाटील यांनी समाजमन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेश गावडे आणि सतीश वणिरे यांना याची माहिती दिली. हे दोघेही त्यांच्या घरी जाऊन आले. शेखर जिथे नोकरीला होते त्यांच्याकडे एकदा नाना पाटेकर आले होते. त्यांच्यासोबत त्यांनी फोटोही काढला होता.

महेश गावडे यांनी हा फोटो आणि सर्व परिस्थिती फेसबुकच्या माध्यमातून शेअर केली. ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनीही पाटेकर यांच्या कानांवर ही बाब घातली आणि चक्क पाटेकर यांचा महेश गावडे यांना फोन आला. ऑपरेशनच्या खर्चाची जबाबदारी त्यांनी उचलली. ऑपरेशन यशस्वी झाले. शेखर यांना डिस्चार्जही मिळाला.सावलीच्या किशोर देशपांडे यांनी ऑपरेशनच्या आधी शेखर यांच्यावर फिजिओथेरपीचे उपचार केले. दरम्यानचा त्यांचा सर्व खर्च केला. समाजमनचे सचिव बाळासाहेब उबाळे यांच्याकडे कोल्हापूर बहुजन पत्रकार संघाने काही मदत दिली आहे. तीदेखील कुलकर्णी यांना दिली जाणार आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूरMakrand Anaspureमकरंद अनासपुरेNana Patekarनाना पाटेकर