उंब्रज परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस...घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 20:01 IST2020-04-29T19:59:47+5:302020-04-29T20:01:37+5:30

सातारा -उंब्रज:-पाटण तालुक्यातील तारळे परिसरातील भागात आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक घरांची पत्रे उडून गेले.या संकटामुळे या ...

Nana Bandivadekar of Panhala celebrated 100th birthday online | उंब्रज परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस...घरांचे नुकसान

उंब्रज परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस...घरांचे नुकसान

ठळक मुद्देया पाऊसामुळे काही ठिकाणचे ओढे भरून वाहू लागल्यामुळे पूरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत होती.

सातारा -उंब्रज:-पाटण तालुक्यातील तारळे परिसरातील भागात आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक घरांची पत्रे उडून गेले.या संकटामुळे या परिसरातील नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान,ज्या ठिकाणी वादळी वादळीवाऱ्यासह आलेल्या पाऊसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.तेथील तलाठी यांनी तातडीने पंचनामा करावा. असे आदेश गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,तारळे परिसरात गोरेवाडी, मुरुड, मरळोशी,घोट,फडतरवाडी खडकवाडी, जंगलवाडी,इतर गावात आज दुपारनंतर वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे या गावातील नागरिकांच्या घराचे पत्रे हवेत उडाले. त्यामुळे घरातील संसारउपयोग वस्तूसह इतर वस्तूचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या पावसामुळे  काही ठिकाणचे ओढे भरून वाहू लागल्यामुळे पूरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत होती.

Web Title: Nana Bandivadekar of Panhala celebrated 100th birthday online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.