शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

प्रशिक्षणाच्या नावाखाली शरद शेळकेंना पुण्याला हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 12:22 PM

मटकाचालक सलीम मुल्ला रॅकेट प्रकरणातील संशयितांच्या नातेवाइकांना भेटायला दिल्याच्या कारणातून कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांना प्रशिक्षणाच्या नावाखाली पुण्याला पाठविले आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात न पाठविण्याचा फतवा : दत्तात्रय गावडे यांच्याकडे पदभारमटक्यातील आरोपींची नातेवाइकांना दिलेल्या भेटीचा ठपका

कोल्हापूर : मटकाचालक सलीम मुल्ला रॅकेट प्रकरणातील संशयितांच्या नातेवाइकांना भेटायला दिल्याच्या कारणातून कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांना प्रशिक्षणाच्या नावाखाली पुण्याला पाठविले आहे.महिन्याभराचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण होऊनदेखील आता पुन्हा कारागृहाकडे पाठविणार नसल्याचा फतवा काढून त्यांना पुण्यामध्येच ठेवले आहे. त्यांनी कैद्यांमध्ये केलेली सुधारणा, कारागृहाचा कायापालट यासह उद्योग, व्यवसाय सुरू करून राज्यात कारागृह अव्वलस्थानी नेऊन ठेवले होते.

अशा अधिकाऱ्यावर एकप्रकारे अन्याय केल्याची चर्चा कारागृह प्रशासनात आहे. दरम्यान येथील प्रभारी अधीक्षक हरीश्चंद्र जाधवर यांची बिंदू चौक सबजेलला बदली केली आहे. तर या ठिकाणी पुन्हा विसापूर (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) येथील खुल्या कारागृहाचे अधीक्षक दत्तात्रय गावडे यांची नियुक्ती केली आहे.यादवनगर-पांजरपोळ येथे दि. ८ एप्रिल २०१९ च्या रात्री मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह त्यांच्या पथकावर माजी उपमहापौर शमा मुल्ला, तिचा पती सलिम मुल्ला याच्यासह ४०० जणांच्या जमावाने हल्ला करत बेदम मारहाण केली होती. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेत, मुल्ला गँगवर कठोर कारवाईचा पवित्रा घेऊन ‘मोक्का’ कारवाई केली.सलिमच्या संपर्कात असणाऱ्या मटका-जुगाराचे मुंबईतील म्होरके प्रकाश सावला, जयेश शहा, वीरज सावला, जितेंद्र गोसालिया, राजेंद्र टोपी यांच्यासह स्थानिक सम्राट कोराणे, मनीष अग्रवाल यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केली. ‘मोक्का’ कारवाईतील संशयित कळंबा कारागृहात आहेत. त्यांना भेटण्यासाठी नातेवाईक येत असतात.

मुंबईतील प्रकाश व वीरज सावला यांना भेटण्यासाठी त्यांचे वडील कारागृहाबाहेर आले होते. त्यांना चालता येत नसल्याचे ते स्टेचरवरून आले होते. मुलाखत कक्षामध्ये भेट न देता कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोर सावला बंधूंची वडिलांसोबत भेट घालून दिली.

अशा भेटी कारागृहात देत असतात, तसे कारागृह अधीक्षकांना अधिकार आहेत; परंतु सावला बंधू आणि वडिलांच्या भेटीचे पोलिसांनी व्हिडीओ चित्रीकरण करून, तसेच या गुन्ह्याच्या तपास अधिकारी उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी पत्र राज्याचे कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांना पाठविले. त्याची दखल घेत कारागृह अधीक्षक शेळके यांना एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी पुण्याला पाठविले. प्रशिक्षण कालावधी पूर्ण होऊनदेखील त्यांना माघारी पाठविलेले नाही. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर