शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Kolhapur: उपनगराध्यक्ष कार्यालयात नमाज पठण, मुरगूड नगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना डच्चू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 13:08 IST

परिपूर्ण तपासासाठी समिती स्थापन

मुरगूड : मुरगूड नगरपालिका इमारतीमध्ये उपनगराध्यक्ष कार्यालयात नमाज पठण केल्याप्रकरणी ठेकेदारी पद्धतीने नेमलेल्या दोन कर्मचाऱ्यांना दोषी ठरवून डच्चू दिला आहे, तर या घटनेची सखोल चौकशी व्हावी यासाठी नगरपालिका प्रशासनाने विशेष समितीची स्थापना केली आहे. दरम्यान, या घटनेचा निषेध करण्यासाठी पुकारलेल्या मुरगूड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नमाज पठण करणाऱ्या त्या दोन युवकांवर शासकीय कार्यालयात विनापरवाना प्रवेश करून नमाज पठण केल्याप्रकरणी मुरगूड पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.

मंगळवारी आठवडी बाजारात व्यापार करण्यासाठी निपाणीहून आलेल्या दोन युवकांनी चक्क नगरपालिका कार्यालयात घुसून नगराध्यक्ष केबिनमध्ये नमाज पठण केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हजारोंचा जमाव पालिका व पोलिस स्टेशन आवारात जमला होता. वातावरण कमालीचे तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मंगळवारी मध्यरात्री बुधवारी मुरगूड बंदची हाक देत संतप्त नागरिक घरी परतले होते.बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास सर्व नागरिक शिवतीर्थावर एकत्र जमले होते. दरम्यान, सकाळपासून शहरातील सर्व व्यवहार कडकडीत बंद होते. एकत्र जमलेले नागरिक शहरातून निषेध फेरी काढत होते. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले. जमाव बंदी आदेश असल्याने रॅली काढू नये अशी विनंती पोलिसांनी केल्यानंतर आंदोलक व पोलिस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. शेवटी कायद्याचे उल्लंघन केल्यास गुन्हे नोंद केले जातील हे सांगितल्यावर निषेध फेरी रद्द करून त्याच ठिकाणी झालेल्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. या प्रकरणी पालिकेचे कोण कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे नागरिकांनी मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांच्याकडे केली. त्यानुसार मुख्याधिकारी यांनी याप्रकरणी कामात हयगय केल्याच्या ठपका ठेवून ठेकेदार पद्धतीने नेमलेल्या दोन कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. शिवाय या घटनेची सखोल चौकशी व्हावी यासाठी पालिकेतील वरिष्ठ चार अधिकाऱ्यांच्या समितीची स्थापना केली आहे.याद्वारे पालिका इमारत परिसर व कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार असून, अन्य कोणी दोषी असल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. यामध्ये नगरपालिका कार्यालय व मुस्लीम समाजाच्या प्रार्थनास्थळाजवळ राखीव दलाच्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर