शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

एन. डी. सरांनी कोरोनालाही हरवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर: सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी उभे आयुष्य संघर्ष करणाऱ्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर: सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी उभे आयुष्य संघर्ष करणाऱ्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील नावाचे ९३ वयाचे काय अजब रसायन आहे, याची प्रचिती कोरोनाने देखील घेतली. त्यांच्या जबरदस्त इच्छाशक्तीसमोर कोरोनाने देखील गुडघे टेकत हार मानली. आठ दिवसांच्या यशस्वी उपचारांनंतर उत्तरायुष्यातील आणखी एका संघर्षावर यशस्वी मात करत प्रा. पाटील रविवारी सुखरूप घरी परतले.

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील हे सध्या वयोमान परत्वे आलेल्या आजारपणामुळे रुईकर कॉलनीतील घरीच उपचार घेत आहेत. शरीर साथ देत नसले तरी मन अजूनही खंबीर आहे. त्यामुळेच गेले वर्षभर जीवघेण्या उपचारानाही ते हसत मुखाने सामोरे जात आहेत.

सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू झाल्यावर एन. डी. सरांना त्यापासून लांब ठेवण्याची पूर्ण दक्षता घेतली गेली होती. त्यांच्यापर्यंत बाहेरचे कोणी थेट पोहोचणार नाही याचीही संपूर्ण काळजी त्यांच्या कुटुंबीयांनी घेतली होती. रोजच्या भेटीगाठी बंद करण्यात आल्या होत्या. त्यांच्या सेवेसाठी विशेष ब्रदरही नियुक्त करण्यात आले होते. सर्वांच्या कोरोना टेस्ट करूनच त्यांच्यापर्यंत सोडले जात होते.

इतकी सारी खबरदारी घेऊन देखील गेल्या आठवड्यात एन. डी. पाटील यांच्यापर्यंत कोरोना पोहोचलाच. साधारण धाप आणि खोकला लागल्यानंतर अँटिजन टेस्ट करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. कुटुंबीयांसह सेवेसाठी असणाऱ्या सर्वांची चाचणी केली. यात सेवेसाठी येणारे एक ब्रदर पॉझिटिव्ह आले. एन. डी. यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. पण तरीही त्रास होत असल्याने त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली. त्यात ते पॉझिटिव्ह आले. यानंतर त्यांना तातडीने अँपल हॉस्पिटल मध्ये दाखल केले गेले. तेथे तातडीने उपचार केले गेले. त्यांनी नेहमीप्रमाणे उपचारालाही उत्तम प्रतिसाद दिला. आठ दिवसांच्या उपचारानंतर ते घरी परत आले.

चौकट

लढाऊ बाणा

गोरगरीब, श्रमिकांसाठी कायम रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या एन. डी. यांचा लढाऊ बाणा कोरोनानेही पाहिला. तरुण पिढी कोरोनासमोर हात टेकत असतानाही लढाऊ बाणा काय असतो याचा आदर्शच एन. डी. यांनी कोरोनावर मात करुन घालून दिला आहे

चौकट

म्हणून हरवू शकले

वेळीच निदान आणि योग्य उपचार झाल्याने वयाच्या ९३ व्या वर्षी एन. डी कोरोनालाही हरवू शकले.

चौकट

आणि जीव भांड्यात पडला

एन. डी. सरांना कोरोना झाला आहे म्हटल्यावर अनेकांचा जीव कासावीस झाला होता, प्रत्येक जण त्यांच्या घरी फोन करून ख्यालीखुशाली जाणून घेत होता, त्यांची प्रकृती चांगली आहे, उपचाराला प्रतिसाद देत आहे हे ऐकून मनाला बरे वाटत होते, रविवारी दुपारी दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन परतल्याची वार्ता ऐकून कासावीस झालेला जीव भांड्यात पडला.