शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

मुश्रीफसमर्थकांनी महाडिक यांचे भाषण रोखले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 6:16 AM

राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेला कोल्हापुरात पक्षांतर्गत गटबाजीचे गालबोट

कागल (जि.कोल्हापूर): राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी परिवर्तन यात्रेच्या कागल येथील सोमवारी झालेल्या सभेत खासदारधनंजय महाडिक हे पक्षाचे नेते व तालुक्याचे आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव घेण्यास अनावधानाने विसरल्याने मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी महाडिक यांचे भाषण रोखले. जोरदार शेरेबाजी करून काही कार्यकर्त्यांनी ‘तुम्ही पाच वर्षे कुठे होता..?’ अशीही विचारणा केली.पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच हा प्रकार घडला. त्यामुळे खासदार महाडिक कमालीचे नाराज झाले. मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना दम दिला व महाडिक यांना पुन्हा बोलण्यास उभे केले; पण या यात्रेला या घटनेमुळे पक्षांतर्गत गटबाजीचे गालबोट लागले. मूळ यात्रेपेक्षा या गटबाजीची व घटनेचीच जास्त दिवसभर झाली.गेले काही दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीमध्ये खासदार महाडिक यांच्या उमेदवारीला होत असलेला विरोध आणि माजी मंत्री आमदार मुश्रीफ यांच्याशी निर्माण झालेल्या मतभेदाचे पडसाद यावेळी उमटले. सोमवारी सकाळी कागल येथे सभा आयोजित केली होती.या सभेत खासदार महाडिक बोलण्यास उभे राहिले. त्यांनी ज्येष्ठतेनुसार अजित पवार, जयंत पाटील व तालुक्याचे कर्तबगार आमदार जयंत पाटील अशी नावे घेतली. बोलण्याच्या ओघात मुश्रीफ यांच्याऐवजी जयंत पाटील यांचेच नाव घेतले असण्याची शक्यता आहे. यातून कार्यकर्त्यांची शेरेबाजी सुरू झाली. तुम्हाला त्यांनी निवडून आणले आहे हे विसरला काय, असेही काहीजण सभेतून म्हणत होते. शेरेबाजी सुरु राहिल्यामुळे महाडिक यांनी भाषणच थांबविले व ते आपल्या जागेवर जाऊन बसले. त्यामुळे सभास्थळी काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. यानंतर अजित पवार यांनी मुश्रीफ यांना सूचना केली.लगेच मुश्रीफ यांनी माईक हातात घेतला व त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये कार्यकर्त्यांना ‘ये गप्प बसा रे..’ असा दम व्यासपीठावरूनच दिला. यानंतर कार्यकर्ते शांत झाले. यानंतर मुश्रीफ यांनी खासदार महाडिक यांना माईकजवळ आणले व भाषण करण्याची सूचना केली.महाडिक यांनी ‘माझे आणि तुमचे नेते हसन मुश्रीफ..’ अशी सुरुवात करून पुन्हा भाषण केले व दिलगिरी व्यक्त करीतभाषण पूर्ण केले. नंतर परिवर्तन यात्रेतील अन्य नेत्यांची भाषणे झाली; परंतु दिवसभर चर्चा झाली ती पाच मिनिटे घडलेल्या या घटनेचीच.उमेदवार कोणीही असो, पाठीशी राहा : अजित पवारया वेळी अजित पवार म्हणाले, शरद पवार यांचे बळकट हात कायमच हसन मुश्रीफ यांच्याही पाठिशी राहिले आहेत. मतभेद असू शकतात; पण एकदा पवार यांनी उमेदवार दिला की त्याला निवडून आणण्याची जबाबदारी कागलकरांनी घेतली पाहिजे. ‘पवारसाहेबच उमेदवार आहेत, असे समजून इमानदारीने तुम्ही काम केले पाहिजे. उमेदवार धनंजय महाडिक असोत किंवा अन्य कोणी, तुम्ही त्यांच्या पाठिशी राहिले पाहिजे. पवार यांच्यासमोर मुश्रीफ यांना कमीपणा येऊ देऊ नका. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. या वेळेपुरते ऐका. मी तुम्हाला व्याजासह परत देतो.’

टॅग्स :Dhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर