शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफ यांच्या विधानाची चौकशी करणार

By admin | Updated: July 26, 2015 00:42 IST

संजयकुमार यांची माहिती : आरोपींची माहिती दिल्यास २५ लाख देवू

कोल्हापूर : ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत गोविंद पानसरे यांचे मारेकरी पोलिसांना सापडले असून, त्यांची नावे जाहीर करण्यास राज्य सरकार प्रतिबंध करत आहे, असा गौप्यस्फोट करणाऱ्या माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांची ‘एसआयटी’चे विशेष पथक चौकशी करेल. मारेकरी सापडलेत तर त्यांना ठेवले कोठे? याबाबत सखोल माहिती त्यांच्याकडून पथक घेईल, त्यांनी नांवे जाहीर केल्यास राज्य शासनाने जाहीर केलेले २५ लाख रुपयांचे बक्षीस त्यांना दिले जाईल असे राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे अप्पर पोलीस महासंचालक (सीआयडी) संजयकुमार यांनी शनिवारी पत्रकारांशी स्पष्ट केले. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे बांधण्यात येत असलेल्या ज्येष्ठ नेते पानसरे यांच्या स्मारकाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ शुक्रवारी सकाळी मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. त्यांच्या या विधानानंतर वृत्तवाहिन्यांवर हे वृत्त झळकल्याने राज्यात खळबळ उडाली. मारेकऱ्यांची नावे लपवून ठेवण्यामागे राज्य सरकार व पोलीस प्रशासनाचा हात असल्याच्या मुश्रीफ यांच्या विधानाने नागरिकांतून संतापाची लाट उसळली. याप्रकरणी मारेकरी सापडले आहेत का, याची चौकशी एसआयटीचे प्रमुख संजयकुमार यांच्याकडे केली असता त्यांनी मुश्रीफ हे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना जे वाटले ते त्यांनी बोलून दाखविले. परंतु मारेकरी सापडले असतील तर त्यांना ठेवले कोठे? आणि लपविण्याचा काहीच संबंध येत नाही. मुश्रीफ यांच्या माहितीनुसार त्यांच्याकडे चौकशी करण्यासाठी ‘एसआयटी’चे विशेष पथक पाठविण्यात येईल. त्यांना कोणत्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आणि मारेकरी कोठे लपविले याबाबत त्यांनी सखोल माहिती द्यावी. चौकशीस मुश्रीफ यांनी सहकार्य करावे. (प्रतिनिधी) मंगळवारी विधानसभेत बोलू : मुश्रीफ दरम्यान आपण शुक्रवारी केलेल्या विधानावर आजही ठाम असून मंगळवारी (दि.२८) आपण विधानसभेत त्यासंबंधीची माहिती सभागृहात देवू असे आमदार मुश्रीफ यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.