‘गडहिंग्लज महाविकास आघाडी""ला मुश्रीफ यांचा तूर्तास नो सिग्नल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:59 IST2021-01-13T04:59:56+5:302021-01-13T04:59:56+5:30
राम मगदूम /गडहिंग्लज : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नागरी सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या राष्ट्रवादी, काँग्रेस व ...

‘गडहिंग्लज महाविकास आघाडी""ला मुश्रीफ यांचा तूर्तास नो सिग्नल
राम मगदूम /गडहिंग्लज : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नागरी सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या मनोगतातूनच त्यांनी जनता दलाला गडहिंग्लज पालिकेच्या सत्तेवरून खाली खेचण्याची ''''जोडणी'''' घातल्याचे ''''ध्वनित'''' झाले. परंतु, मुश्रीफांनी जनता दलासंदर्भात कोणतेही भाष्य करण्याचे खुबीने टाळल्यामुळे ''''गडहिंग्लज महाविकास आघाडी''''ला तूर्तास त्यांचा ''''सिग्नल'''' नसल्याचे स्पष्ट झाले.
गेल्यावेळच्या तिरंगी सामन्यात विरोधी राष्ट्रवादी आणि भाजप - शिवसेना युतीचा पाडाव करून ''''जद''''ने स्पष्ट बहुमताने सत्ता अबाधित राखली. दरम्यान, बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर ''''महाविकास''''च्या माध्यमातून जनता दलाला सत्तेतून दूर करण्याचा चंग बांधण्यात आला आहे. त्यासाठी पालिकेला ११ कोटींचा निधी दिल्याबद्दल मुश्रीफांच्या नागरी सत्काराचे निमित्त शोधण्यात आले होते.
राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद हारुण सय्यद यांचा आवाजच पालिकेच्या सभागृहात ऐकू येत नाही. गेल्या २० वर्षांत रिंग रोड, भाजी मंडई, कचरा प्रकल्प, सुधारित आराखडा व हद्दवाडीला राष्ट्रवादीमुळेच मंजुरी मिळाली. ''''चौथाई''''च्या राजकारणातून शहराचा विकास होणार नाही, हे लोकांना माहीत असतानादेखील पुन्हा तेच सत्तेवर कसे? असा सवाल राष्ट्रवादीच्या किरण कदम यांनी प्रास्ताविकात केला. परंतु, आयुष्यात पहिल्यांदाच कदम यांनी इतके लांबलचक भाषण केले, एवढंच मुश्रीफ म्हणाले.
काँग्रेसचे किसनराव कुराडे यांनी अध्यक्षीय भाषणात अनेक विशेषणे लावून मुश्रीफांचे कौतुक केले आणि विकासकामांसाठी आघाडीतील कार्यकर्त्यांची समिती स्थापन करावी, अशी सूचना केली. परंतु, त्यांच्या उपदेशालादेखील मुश्रीफांकडून प्रतिसाद मिळाला नाही.
आठवड्यापूर्वी पालिकेच्या कार्यक्रमात ''''जद''''चे नगराध्यक्ष स्वाती कोरी आणि उपनगराध्यक्ष महेश कोरी यांचे जाहीरपणे कौतुक केलेल्या मुश्रीफांनी आपल्या कार्यकर्त्यांनादेखील ''''घारी''''सारखे माझेही तुमच्याकडे ''''लक्ष'''' आहे एवढेच सांगितले. त्याचा ''''अन्वयार्थ'''' जाणकारांकडून लावला जात आहे. ------
बातमीत हसन मुश्रीफ यांचा फोटो वापरावा.