मुश्रीफ-सतेज पाटील आज प्रमुख नेत्यांना भेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:25 IST2021-04-04T04:25:59+5:302021-04-04T04:25:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील जोडण्या लावण्यासाठी उद्या (रविवार, ता. ४) दिवसभरात ग्रामविकासमंत्री हसन ...

मुश्रीफ-सतेज पाटील आज प्रमुख नेत्यांना भेटणार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील जोडण्या लावण्यासाठी उद्या (रविवार, ता. ४) दिवसभरात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील प्रमुख नेत्यांना भेटणार आहेत..
माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार उल्हास पाटील, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना ते भेटणार आहेत. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या भेटी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
हे दोन्ही नेते दुपारी ४ वाजता माजी आमदार कुपेकर यांना कोल्हापुरातील निवासस्थानी भेटणार आहेत. त्यानंतर ५ वाजता इचलकरंजी येथे आमदार आवाडे यांची भेट घेणार आहेत. ६ वाजता शिरोळमध्ये उल्हास पाटील यांना त्यांच्या निवासस्थानी भेटणार आहेत. शिरोळमध्येच ६.३० वाजता माजी खासदार शेट्टी यांच्या निवासस्थानी हे दोघेही नेते जाणार आहेत. त्यानंतर ७ वाजता दत्त कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांना भेटणार आहेत. शेवटची भेट म्हणून आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांच्या जयसिंगपुरातील निवासस्थानी संध्याकाळी ७.३० वाजता मंत्री यड्रावकर यांना ते भेटणार आहेत.
*****