शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफ साहेब कुराणावर हात ठेवून सांगा, मी कोणाचे पाय धरले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 12:28 IST

मंत्री हसन मुश्रीफ व जितेंद्र आव्हाड यांच्यातील शाब्दीक युद्ध ‘कोल्हापुरी चपलापर्यंत गेले

कोल्हापूर : ठाण्यातील एका प्रकरणात मी भाजप नेत्यांचे पाय धरल्याचा आरोप वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात केला होता. पण, मुश्रीफ साहेब कुराणावर हात ठेवून खरे सांगा, मी कोणाचे पाय धरले? आई, वडील व शरद पवार यांच्याशिवाय आपण कोणाचेही पाय धरत नसल्याचा पलटवार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला, याची सोमवारी सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू होती.मंत्री हसन मुश्रीफजितेंद्र आव्हाड यांच्यातील शाब्दीक युद्ध ‘कोल्हापुरी चपलापर्यंत गेले. यावर न थांबता, कोणी-कोणी भाजप नेत्यांचे पाय धरले, असे आरोप-प्रत्यारोपही सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत. मंत्री मुश्रीफ यांच्या आरोपावर बोलताना आमदार आव्हाड म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांनी माझ्यावर टीका केली, मी टीकेला कोणाच्या बापाला घाबरत नाही. पण, जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेत्याचे पाय धरले, हे तुम्हाला सांगणारा मूर्ख कोण आहे. तुम्ही ज्या जयंत पाटील यांचे नाव घेता, ते असे बोलणारच नाही. तुम्ही जयंत पाटील यांचे नाव घेत असाल तर त्यांनी तुम्हाला एका प्रकरणात मोठी मदत केली होती. त्या प्रकरणात मदत करणारा कोणाचा माणूस होता, हे जरा जयंत पाटील यांना विचारा. ती मदत किती मोठी होती, त्याची कल्पना तुम्हालाही आहे.सगळे नेते बसलो त्यावेळी आपण एकत्र यायला पाहिजे, असे एका नेत्याने मला सांगितले. मात्र, मी येऊ शकत नाही, विचारधारा सोडू शकत नाही, तुम्हाला वाटले तर विधान परिषदेवर घ्या, असे मी म्हटलो होतो. कोणाच्या पाया पडलो नाही. त्यांनी कुराणावर हात ठेवून खरे बोलावे. आयुष्यभर खोटारडेपणा करणारे व रुग्णांच्या नावावर कोट्यवधी रुपये कमावणाऱ्यांकडून काय अपेक्षा करायची? मुश्रीफ साहेब माझे तोंड उघडू नका, मी कमी बोलतो, लोकांमध्ये कमी मिसळतो, तेव्हा हात जोडून सांगतो, माझ्यावर टीका करू नका, नाहीतर यापेक्षाही विषारी टीका मी करू शकतो. माझी चूक नसताना कोणाच्या बापाचे ऐकत नाही. मरणापर्यंत शरद पवार यांच्यासोबतच राहणार, तुमच्या सारखे अर्धवट सोडून पळून जाणारा नाही. असेही आव्हाड यांनी म्हटले असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणSocial Mediaसोशल मीडियाJitendra Awhadजितेंद्र आव्हाडHasan Mushrifहसन मुश्रीफ