शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बाळूमामाचे भाविक बनून आले अन् ४० हजारांची लाच घेणाऱ्याला पकडले, मुरगूडच्या नगर अभियंत्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 11:59 IST

हुपरी येथील कामाच्या मोबादल्यात लाच

मुरगूड : हुपरी नगरपरिषदेंतर्गत केलेल्या कामांचे एमबी रजिस्टर पूर्ण करून देण्यासाठी तब्बल दीड लाख रुपयांची लाच मागणाऱ्या नगर अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एस. टी. स्टॅण्डवर रंगेहाथ पकडल्याची घटना मुरगूड येथे घडली. प्रदीप पांडुरंग देसाई (वय ३२, रा. मिनचे खुर्द, ता. भुदरगड) असे अटक केलेल्याचे नाव असून, तो नगरपरिषद मुरगूड येथे नगर अभियंता (स्थापत्य) या पदावर कार्यरत आहे.या प्रकरणात ४७ वर्षीय तक्रारदाराने १९ जानेवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली होती. यातील तक्रारदार हा काॅन्ट्रॅक्टर असून, त्याने हुपरी नगरपरिषदेंतर्गत कामे पूर्ण केली. या कामाचे सुमारे ७० लाख बिल निघणे बाकी आहे. संबंधित कामांचे एमबी रजिस्टर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात आरोपी अभियंत्याने एकूण १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली होती. यापूर्वी आरोपीने ५० हजार रुपये स्वीकारल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.ठेकेदाराचे एमबी रजिस्टर देसाई यांनी बदली झाल्यानंतर आपल्याबरोबरच आणले आहे. ते पूर्ण करावे, यासाठी या ठेकेदाराने वेळोवेळी देसाई यांना विनंती केली होती. पण देसाई यांनी या कामासाठी दीड लाखांची मागणी केली. तडजोडीअंती १ लाख ३० हजार रुपये देण्याचे ठरले होते, त्यापैकी पहिला हप्ता म्हणून ४० हजार रुपये स्वीकारताना आज मुरगूड एसटी स्टॅण्डवर आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीची अंगझडती, वाहन व कार्यालयाची झडती पंचांसमक्ष घेतली असून, त्याचा मोबाईल तपासासाठी जप्त केला आहे.या प्रकरणी मुरगूड पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर करत आहेत. ही सापळा कारवाई पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, सुधीर पाटील, संदीप काशीद, कृष्णा पाटील, प्रशांत दावणे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

स्टॅण्डवर लावला सापळामुरगूड नगरपरिषदेची इमारत एसटी स्टॅण्डला लागूनच आहे. देसाई यांनी आपली चारचाकी गाडी एसटी स्टॅण्डच्या रिकाम्या जागेत लावली होती. तक्रारदाराने सव्वापाचच्या सुमारास देसाई यांना आपण ४० हजार घेऊन आलो आहे, असे सांगितले. त्यानंतर देसाई स्टॅण्डवर आला. त्याने आपल्या गाडीचे दार उघडले त्यावेळी तक्रारदाराने आणलेली रक्कम गाडीत ठेवली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी छापा टाकला आणि सदरची रक्कम आणि देसाई यांना ताब्यात घेतले. तसेच चारचाकी गाडीही पोलिसांनी जप्त केली.

सर्वांनी लावला भंडारा...मुरगूडच्या एसटी स्टॅण्डवर मोठी गर्दी होती. सापळा लावला आहे याची जाणीव आरोपीला होऊ नये, यासाठी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. सर्व कर्मचारी साध्या गणवेशात होते. शिवाय सर्वांनी आदमापूरच्या बाळूमामांचे दर्शन घेणारे भाविकच वाटावे, यासाठी कपाळ भरून भंडारा लावला होता. त्यामुळे पालिका कार्यालयातून स्टॅण्डपर्यंत चालत येताना देसाई याला कोणताच संशय आला नाही.

हुपरीमध्येही अनेक तक्रारीदेसाई हा मुरगूडला येण्याअगोदर हुपरी येथे कार्यरत होता. याठिकाणीही त्याच्याविरोधात अनेक तक्रारी व आरोप झाले होते. काही प्रकरणे पोलिस ठाण्यापर्यंत गेली होती. पण ती तडजोड करून निकालात काढल्याचे हुपरीमधील अनेक नागरिकांनी सांगितले. देसाई यांच्या कारकिर्दीत झालेल्या सर्व कामांची चौकशी करावी, अशी मागणी हुपरीतील नागरिकांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Engineer arrested for accepting bribe; devotees disguise foiled plan.

Web Summary : A Murugud municipal engineer was arrested accepting a ₹40,000 bribe for clearing contractor bills. Disguised as devotees, anti-corruption officers laid a trap at the bus stand after a complaint was filed. He had previously allegedly taken ₹50,000, demanding ₹1.5 lakh total.