निपाणीजवळ युवतीचा खून, जळालेला मृतदेह बिडी कारखान्याच्या परिसरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 17:35 IST2019-06-15T17:14:03+5:302019-06-15T17:35:08+5:30

राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक ४ वर निपाणीनजीक असलेल्या तीस छाप बिडी कारखान्याच्या परिसरात  गव्हाणी हद्दीत १८ ते २० वयोगटातल्या युवतीचा खून करून मृतदेह टाकण्यात आला आहे. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असून ओळख पटणे अवघड बनले आहे.

The murder of the young woman near the milkman, in the premises of the Bidi factory | निपाणीजवळ युवतीचा खून, जळालेला मृतदेह बिडी कारखान्याच्या परिसरात

निपाणीजवळ युवतीचा खून, जळालेला मृतदेह बिडी कारखान्याच्या परिसरात

निपाणी :राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक ४ वर निपाणीनजीक असलेल्या तीस छाप बिडी कारखान्याच्या परिसरात गव्हाणी हद्दीत १८ ते २० वयोगटातल्या युवतीचा खून करून मृतदेह टाकण्यात आला आहे. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असून ओळख पटणे अवघड बनले आहे.

गव्हाणी हद्दीत तीस छाप बिडी कारखान्याच्या परिसरात युवतीचा मृतदेह जाळल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. 

तीस छाप बिडी कारखान्याच्या परिसरात पाण्याच्या टाकीजवळ शनिवारी सकाळी गव्हाणी हद्दीत १८ ते २० वयोगटातल्या युवतीचा खून करून टाकण्यात आलेला मृतदेह येथील नागरिकांना आढळून आला.  त्यांनी याची माहिती देताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेह अर्धवट जळाला असून मृतदेहावर ऍसिड टाकण्यात आल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले असून अधिक तपास सुरू आहे.  मृतदेहाच्या अंगावर पंजाबी ड्रेस असून १८ ते २० वयोगटातील युवतीचा मृतदेह असल्याचा अंदाज आहे.

निपाणी शहर पोलिस ठाण्याला या घटनेची माहिती मिळताच मंडळ पोलीस निरीक्षक करणेशगौडा, उपनिरीक्षक एच. डी. मुल्ला आणि सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली.  येथील महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह ठेवला असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. चेहरा ओळखू नये यासाठी ऍसिड वापरून मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

Web Title: The murder of the young woman near the milkman, in the premises of the Bidi factory