शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Kolhapur: अंबप येथे तरुणाचा निर्घृण खून, संशयिताच्या शोधासाठी पथके रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 12:15 IST

शालेय वादाची जुनी पार्श्वभूमी

पेठवडगाव : अंबप (ता. हातकणंगले) येथे १९ वर्षीय तरुणाचा अज्ञात तीन तरुणांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. पूर्ववैमनस्यातून खून झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यश किरण दाभाडे (वय १९, रा. अंबप) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.घटनास्थळ व पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, अंबप ते अंबप फाटा रस्त्यावर बौद्ध समाजाची स्मशानभूमी आहे. येथे शेजारीच पाण्याची टाकी आहे. येथे नेहमी ग्रामस्थ बसतात. दरम्यान, यश दाभाडे सायंकाळी अंबप येथील पाण्याच्या टाकीजवळ बसलेला होता. दरम्यान, सातच्या सुमारास मोटारसायकलवरून तीन तरुण अचानक आले. त्यांनी बेसावध असलेल्या यशवर कोयत्याने सपासप वार करून महामार्गाच्या दिशेने ते पळून गेले. या हल्ल्यात यशच्या डोक्यात वर्मी घाव बसला, तसेच अतिरक्त रक्त व झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या डोक्यात आठ वार केले होते तर डावा हात मनगटातून तुटला होता.दरम्यान, या पाण्याच्या टाकीतील पाणी महिला भरत असताना रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह निदर्शनास आला. या महिलेने ओरडत या घटनेची माहिती दिली. घटना उघडकीस आल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दरम्यान, पेठवडगावचे पोलिस निरीक्षक विलास भोसले, सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडक, संजय माने, उपनिरीक्षक संतोष माने यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.कोल्हापूरहून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक दाखल झाले, तसेच श्वानपथक, शोधपथकही दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून नवे पारगाव येथे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. संशयितांच्या शोधासाठी पथके तैनात केली आहेत. यश दाभाडे याच्या पश्चात आई-वडील व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. तो एकुलता होता. वडील इचलकरंजी येथे बेकरी चालवितात तर आई एका शाळेत नोकरीला होत्या.

शालेय वादाची जुनी पार्श्वभूमीयश दाभाडे याच्याविरोधात १० सप्टेंबर २०२३ ला तरुणावर चाकूने वार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याअंतर्गत त्याला ताब्यात घेण्यात आले होते. तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला सुधारगृहात ठेवण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी तो गावात आला होता. या प्रकरणातून खून झाला असावा का, याचा तपास पोलिस करत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस