शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: पत्नीवर चारित्र्याचा संशय; फिरायला म्हणून घेवून गेला, अन् डोक्यात दगड घातला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 11:44 IST

बोलण्यात गुंतवून पत्नीच्या डोक्यात घातला दगड

प्रकाश पाटीलकोपार्डे : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. स्नेहल नितीन अहिवळे (खडकी ता. मंगळवेढा, सोलापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. कोल्हापूर -गगनबावडा  रस्त्यावर बालिंगे पुलानजीक ही घटना घडली. खूनाच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.याबाबत घटनास्थळ आणि करवीर पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, नितीन दगडू अहिवळे हे आपली पत्नी स्नेहल यांच्यासह गुरुदत्त शुगर वर्क्स टाकळीवाडी येथे ऊस तोडणीचे काम करतात. आपल्या पत्नीचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय नितीन याच्या मनामध्ये होता. त्यामुळे त्याने काल, सोमवारी रात्री पत्नी स्नेहल हिला फिरायला जाण्याच्या निमित्ताने कोल्हापूर - गगनबावडा राज्यरस्त्यावरील बालिंगे पुलाजवळ घेऊन आला. पुलाशेजारी असणाऱ्या सहदेव बाबुराव जांभळे (बालिंगे) यांच्या नदीकाठच्या उसाच्या प्लॉटमध्ये त्याने तिला बोलण्यात गुंतवून शेजारी असणारा बांधावरील मोठा दगड उचलून पत्नीच्या डोक्यात घातला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संशयित आरोपी नितीन आज सकाळी लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशनमध्ये गेला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्याला करवीर पोलिस ठाण्यात पाठवले. करवीर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी याबाबत संबंधित महिलेच्या नातेवाईकांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक  प्रिया पाटील यांनी भेट दिली.  क्राइम ब्रँचचे सुभाष सरवडेकर, विजय तळसकर, सुजय दळवी, अमोल चव्हाण, योगेश शिंदे यांनी भेट दिली. याबाबत पुढील तपास सुरू आहे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस