शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

kolhapur news: जगतापनगरमधील ऋषीकेशचा खून आर्थिक वादातून, चौघांना अटक; पोलिसांनी चोवीस तासांत लावला छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 11:48 IST

यातील एका संशयिताच्या घरी पोलिस चौकशीला गेल्यानंतर त्याच्या आईला धक्का बसला. त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला

कोल्हापूर : जगतापनगर पाचगाव येथे बुधवारी रात्री झालेल्या ऋषीकेश ऊर्फ संभा महादेव सूर्यवंशी (वय २५, रा. गणेशनगर, चंबुखडी, शिंगणापूर) यांच्या खुनाचा पोलिसांनी चोवीस तासांत छडा लावला असून या खूनप्रकरणी चौघा तरुणांना अटक केली आहे. पूर्ववैमनस्य व आर्थिक देवघेवीच्या वादातून बुधवारी (दि. १८) रात्री दगडाने ठेचून व चाकूचे वार करून ऋषीकेशचा खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. करवीरचे पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत खुनाच्या तपासाची माहिती दिली.ऋषभ विजय साळोखे (वय २१, रा. हरिमंदिराच्या मागे, रामानंदनगर), सोहम संजय शेळके (२०, स्वाती विहार अपार्टमेंट, गजानन महाराजनगर), गणेश लिंगाप्पा यलगटी (२०, रा, अमृतनगर, गिरगाव-पाचगाव रोड), अथर्व संजय हावळ (२०, रा. कुंभार गल्ली, शाहू उद्यानमागे, मंगळवार पेठ) चार संशयितांचा समावेश आहे. या चौघा संशयितांना आज, शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.याबाबतची अधिक माहिती अशी, बुधवारी रात्री जगताप काॅलनी परिसरातील निर्जन माळावर ऋषीकेश सूर्यवंशी याचा डोक्यात दगड घालून तसेच चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा करवीर पोलिसांनी २४ तासांत उलगडा करून चौघांना अटक केली.ही कारवाई करवीर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्तरीत्या केली. यात करवीरचे पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, पाेलिस निरीक्षक अजय सिंदकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी मार्गदर्शन केले. यात सुभाष सरवडेकर, सुजय दावणे, योगेश शिंदे, अमोल चव्हाण, दिलीप घाटगे, विजय पाटील, अशोक मंत्रे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अजय वाडेकर, सहायक फौजदार सुनील कवळेकर, ओंकार परब, प्रशांत कांबळे, विनायक चौगुले, संजय कुंभार यांनी यांनी चांगली कामगिरी बजावली.तिघे एकाच गाडीवरूनबुधवारी (दि. १८) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मृत ऋषिकेश, अथर्व व गणेश हे तिघे गंगावेश चौकात एकत्र भेटले. ऋषिकेशला संशयितांनी आपल्या मोपेडवर बसवून एका बारमध्ये नेले. त्या ठिकाणी तिघांनीही भरपूर मद्यप्राशन करून ते पाचगावच्या दिशेने गेले. पाचगावात पोहोचल्यानंतर घटनास्थळी त्यांनी पुन्हा मद्यप्राशन केले. दरम्यान गणेश व अथर्वची ऋषीकेशसोबत झटापट झाली. यातून गणेशने ऋषीकेशच्या डोक्यात दगड घातला; तर वृषभने त्याच्यावर चाकूने वार केले.संशयिताच्या आईचा आत्महत्येचा प्रयत्नयातील एका संशयिताच्या घरी पोलिस चौकशीला गेल्यानंतर त्याच्या आईला धक्का बसला. त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना नातेवाइकांनी तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याची सीपीआर पोलिस चौकीत नोंद झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस