शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

Kolhapur: एकतर्फी प्रेमाचा त्रिकोण; अडसर ठरणाऱ्या मित्राचाच काढला काटा, केर्लेपैकी हनुमाननगरातील खून उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 14:12 IST

आणि वाचा फुटली

पोर्ले तर्फ ठाणे : करवीर तालुक्यातील केर्लेपैकी हनुमाननगरातील खणीत मृ्त्यू झालेल्या महेंद्र प्रशांत कुंभार (वय १८) या तरुणाचा अपघाती मृत्यू नसून, त्याचा घातपात झाल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. एकतर्फी प्रेमात अडसर बनणाऱ्या महेंद्रला दगडाच्या खणीत ढकलून त्याचा खून केल्याचे सांगितले. गुरुवारी रात्री सहायक फौजदार विकास जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा नोंद करून अटक केली.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, केर्ले गावातील महेंद्र आणि अल्पवयीन आरोपी लहानपणाचे जिगरी दोस्त होते. महेंद्रचे गावातील मुलीशी प्रेमसंबंध होते; तर त्याच मुलीवर आरोपीचे एकतर्फी प्रेम होते. हे दोघेजण एकमेकांशी बोलतात, भेटतात आणि फिरत असल्याचा राग आरोपीच्या मनात होता. आपल्या प्रेमाला अडसर ठरू नये म्हणून महेंद्रचा जिवलग मित्राने खून केला. फेब्रुवारीत दोघांत कडाक्याचे भांडण झाले होते.

मंगळवारी (दि. ३) रात्री महेंद्रला आरोपीने केर्लेपैकी हनुमाननगरातील मोहित्यांच्या खणीजवळ फोनवरून बोलावून घेतले. सुरुवातीला दोघांत बाचाबाची झाली होती. तत्पूर्वी आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी महेंद्रचा मोबाइल फोडला होता; तर दुचाकीची चावी काढून फेकली होती. बाचाबाचीचे रूपांतर भांडणात झाले. झटापटीत आरोपीने जोरदार धक्का दिल्याने, महेंद्र १२५ फूट खोल खणीत पडला.महेंद्रला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुद्धावस्थेत खणीत पडला होता. दरम्यान, मंगळवारी रात्री महेंद्रला मित्राचा फोन आला म्हणून घरातून घाईगडबडीने बाहेर गेला होता. त्याचा फोन बंद असल्याने नातेवाइकांनी त्याची शोधाशोध सुरू केली असता दगडाचा खणीत बेशुद्धावस्थेत आढळलेल्या महेंद्रचा उपचारादरम्यान सीपीआरमध्ये मृत्यू झाला.

संशयास्पद वाटणाऱ्या मृत्यूबाबत पोलिसांनी तपास सुरू केला. मोबाइल डिटेल्स तपासल्यानंतर यातून भलतेच प्रकरण समोर आले; कारण महेंद्रचा शेवटचा फोन आणि आरोपीचे मोबाइल लोकेशन खणीची परिसर दाखवत असल्याने आरोपीकडून कसून चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली.

आणि वाचा फुटलीमहेंद्र आणि आरोपी वर्गमित्र असल्याने पहिलीपासून दोघेजण जिवलग मित्र होते; परंतु प्रेमाच्या त्रिकोणाने मित्रत्वाचा घात केला. दोघांची पसंती एकच असल्याने एकतर्फी प्रेमातून मित्राने कट रचून मित्राचा काटा काढला; पण ‘तीन त्रिकूट आणि सारा इस्कूट’ झाला. बुधवारी ‘लोकमत’मध्ये ‘केर्लेच्या खणीत तरुणाचा अपघाती मृत्यू की घातपात,’ अशी बातमी प्रसिद्ध करून या प्रकरणाला वाचा फोडली होती.

कटात आणखी काहीजणमाझ्या भावाचा खून झाला असून तो एकट्याने नव्हे तर या कटात अजून काहीजणांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी करून सर्व प्रकरण उजेडात आणावे; शिवाय मोकाट फिरणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल झाला नाही तर जनआंदोलन करणार असल्याचा इशारा महेंद्रचा भाऊ सचिन कुंभार यांनी दिला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस