शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज मिळवून न दिल्याने खून, कोल्हापुरातील वाशी नाका येथील संशयास्पद मृतदेहाचा उलगडा; तिघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 11:35 IST

कोल्हापूर : व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून घेतलेले ६५ हजार रुपये परत न देता कर्ज मिळवून न दिल्याने ...

कोल्हापूर : व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून घेतलेले ६५ हजार रुपये परत न देता कर्ज मिळवून न दिल्याने प्रकाश जयवंत दळवी (वय ४५, रा. सासनेनगर, आयटीआय हॉस्टेलमागे, कोल्हापूर) यांचा पाच जणांनी खून केल्याचे करवीर पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले.याप्रकरणी पोलिसांनी सचिन भीमराव घाटगे (वय ३२), बंडू उर्फ रोहित रामचंद्र कांबळे (२८) आणि योगेश गुंडा खोंद्रे (३१, तिघे रा. शिरोली दुमाला, ता. करवीर) यांना मंगळवारी (दि. ८) अटक केली. अजिंक्य शिवाजी शहापुरे (रा. आर. के नगर) आणि ओंकार अनिल पाटील (रा. शिरोली दुमाला) यांचा शोध सुरू आहे.करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश दळवी याने सचिन घाटगे याला व्यवसायासाठी कमी व्याज दरात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यासाठी प्रोसेस फी म्हणून वेळोवेळी ६५ हजार रुपये ऑनलाइन घेतले होते. मात्र, कर्ज मिळवून दिले नाही. दळवी हा जरगनगर येथील एका बीअर बारमध्ये दारू पित बसल्याची माहिती मिळताच सचिन घाटगे आणि अजिंक्य शहापुरे हे दोघे बुधवारी (दि. २) रात्री त्याला भेटायला गेले. कर्जाबद्दल विचारणा केल्यानंतर त्याने कर्ज आणि त्यासाठी घेतलेले पैसेही देणार नसल्याचे सांगितले. यावरून वाद वाढला.दोघे त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पुईखडी येथे घेऊन गेले. तेथे बंडू कांबळे, योगेश खोंद्रे आणि ओंकार पाटील या तिघांना बोलावून घेतले. पाच जणांनी त्याला लाथाबुक्क्याने आणि कोल्हापुरी पायताणाने बेदम मारहाण केली. पोलिसात तक्रार करेल या भीतीने रात्री उशिरा त्याला शिरोली दुमाला येथील पठार नवाच्या शेतात एका खोपीत डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशी दुपारी त्याला वाशी नाका येथे आणून सोडले. याच परिसरात रात्री आठच्या सुमारास तो मृतावस्थेत आढळला होता.वादाच्या माहितीने खुनाचा उलगडाजरगनगर येथील एका बारमध्ये बुधवारी रात्री दळवी याचा दोघांशी वाद झाल्याची माहिती करवीर उपअधीक्षक कार्यालयातील एका कॉन्स्टेबलने करवीर पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी बारमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, संशयितांचा शोध लागला. ताब्यात घेऊन चौकशी करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

संशयितांकडून वसुलीची कामेअटकेतील घाटगे आणि शहापुरे हे दोघे करवीर परिसरातील एका महिलेसाठी वसुलीचे काम करतात. ती खासगी सावकारी करते. या गुन्ह्यात तिचा सहभाग आहे काय, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. शहापुरे याच्यावर यापूर्वीचे काही गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस