शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

दारूच्या नशेत गडहिंग्लज तालुक्यात मुलाकडून आईचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 16:43 IST

किरकोळ भांडणातून पोटच्या मुलानेच दारूच्या नशेत लाकडाने डोक्यावर प्रहार करून वयोवृद्ध आईचा खून केला. सुनंदा शंकर जावळे (वय ६५)असे मृत महिलेचे नाव आहे. गडहिंग्लज तालुक्यातील वडरगे येथे रविवारी(१५) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर संशयित आरोपी विनायक हा पसार झाला आहे.

ठळक मुद्देदारूच्या नशेत गडहिंग्लज तालुक्यात मुलाकडून आईचा खून किरकोळ भांडणातून डोक्यावर लाकडाने प्रहार

गडहिंग्लज : किरकोळ भांडणातून पोटच्या मुलानेच दारूच्या नशेत लाकडाने डोक्यावर प्रहार करून वयोवृद्ध आईचा खून केला. सुनंदा शंकर जावळे (वय ६५)असे मृत महिलेचे नाव आहे. गडहिंग्लज तालुक्यातील वडरगे येथे रविवारी(१५) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर संशयित आरोपी विनायक हा पसार झाला आहे.पोलिस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, वडरगे येथे गुरूवारपासून ग्रामदैवत श्री. गोसावीनाथ देवाची पंचवार्षिक यात्रा (भंडारा)सुरू आहे. यानिमित्त सुनंदा यांच्या विवाहित मुली व पाहुणेमंडळी वडरगेत आली होती. यात्रेनंतर काहीमंडळी आपल्या गावी परत गेली.

रविवारी (१५) रात्री नंदा, त्यांचे पती शिवाजी आणि बहिण वंदना जाधव ही मंडळी देवदर्शन आणि गावातील नातेवाईकांना भेटायला गेली होती. आई सुनंदा आणि मुलगा विनायक हे दोघेच घरात होते. त्यावेळी झालेल्या वादावादीत विनायक याने दारुच्या नशेत लाकडी पट्टीने आईच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला.लाकडाचा वार वर्मी लागून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सुनंदा या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. दरम्यान, देवदर्शन घेवून पाहुणेमंडळी घरी परतताच घाबरलेल्या विनायकने दरवाजाला कडी लावून धूम ठोकली.पाहुणेमंडळी व आजूबाजूच्या लोकांनी कडी काढून दरवाजा उघडला असता सुनंदा या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आल्या. त्यांनी तात्काळ तिला गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आणले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

घटनास्थळी पोलिस उपअधिक्षक अंगद जाधवर, सहायक पोलिस निरीक्षक दिनेश काशिद यांनी भेट दिली. नंदा शिवाजी वळतकर (रा. महागाव, ता. गडहिंग्लज) यांच्या फिर्यादीवरून पोलिसात विनायकविरुद्ध गुन्हा दाखला झाला आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल चौधरी अधिक तपास करीत आहेत. वडीलांनीही केला होता खूनसंशयित आरोपी विनायकचे वडील शंकर यांनाही गावातील एका व्यक्तीच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली होती. दोन वर्षापूर्वी एस.टी.अपघात त्यांचा मृत्यू झाला. विनायककडून आईचा खून झाल्यानंतर त्याच्या वडीलांकडून झालेल्या खूनाची ग्रामस्थांत चर्चा सुरू आहे. 

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी