नगरपालिकेच्या शाळा मॉडेल स्कूल बनविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 11:19 AM2021-07-21T11:19:52+5:302021-07-21T11:21:29+5:30

School Gadhinglaj Kolhapur :दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून नगरपालिका शाळांनी खाजगी शाळांच्या स्पर्धेतदेखील आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवले असून त्या मॉडेल स्कूल बनविण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी दिली.

Municipal schools will be made model schools | नगरपालिकेच्या शाळा मॉडेल स्कूल बनविणार

गडहिंग्लज येथे नेहरू चौकातील काळू मास्तरांच्या पुतळ्याचे पूजन सुनिता पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी गुंड्या पाटील, प्रकाश पोवार, प्रभाकर डोमणे, विष्णू कुराडे, सागर पाटील आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देनगरपालिकेच्या शाळा मॉडेल स्कूल बनविणार : नागेंद्र मुतकेकरगडहिंग्लजला आद्यशिक्षक काळू मास्तरांची पुण्यतिथी

गडहिंग्लज :दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून नगरपालिका शाळांनी खाजगी शाळांच्या स्पर्धेतदेखील आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवले असून त्या मॉडेल स्कूल बनविण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी दिली.

येथील काळू मास्तर विद्यालयात गडहिंग्लजचे आद्यशिक्षक काळू नाना पोवार यांच्या ७९ व्या पुण्यतिथीनिमित्त अयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वाचनालय व शिक्षण समिती सभापती सुनिता पाटील होत्या.

मुख्याधिकारी मुतकेकर म्हणाले, केवळ शैक्षणिक गुणवत्तेमुळेच काळू मास्तर विद्यालयाची पटसंख्या ४ वर्षात चौपट झाली आहे. शाळेच्या सर्व भौतिक गरजा प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील.

प्रारंभी नेहरू चौकातील काळू मास्तरांच्या पुतळ्याचे पूजन सभापती पाटील यांच्याहस्ते तर काळू मास्तरांच्या निवासस्थानी गुंड्या पाटील यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. कार्यक्रमास नगरसेवक हारूण सय्यद व उदय पाटील, प्रभाकर डोमणे, प्रकाश पोवार, संतोष सावरतकर, सागर पाटील, पांडुरंग कांबळे, मिनाज अत्तार, राजश्री देवेकर आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक विष्णू कुराडे यांनी प्रास्ताविक केले. किरण भोसले यांनी सूत्रसंचलन केले. पुष्पा पाटील यांनी आभार मानले.

मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार

कोरोना लढ्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांचा तर काळू मास्तरांच्या माहितीचा डिजीटल बोर्ड तयार केल्याबद्दल गुंड्या पाटील यांचा नगरसेवक उदय पाटील यांच्याहस्ते सत्कार झाला.



 

Web Title: Municipal schools will be made model schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.