शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

‘अनिकेत’च्या कामगिरीचा महापालिकेला विसर-: युवा फुटबॉलपटू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:09 IST

कोल्हापूर : एरव्ही राज्यस्तरीय,राष्ट्रीय शालेय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आमंत्रित करून गौरव केला जातो.

ठळक मुद्देकोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला बाजूला ठेवण्यासारखे काम आहे.

सचिन भोसले ।कोल्हापूर : एरव्ही राज्यस्तरीय,राष्ट्रीय शालेय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आमंत्रित करून गौरव केला जातो. मात्र, युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा खेळलेला महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू अनिकेत जाधवचा विसर पडला आहे. याबद्दल क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूरच्या कोणत्याही खेळाडूने कुस्ती, क्रिकेट, कबड्डी, खो-खो, धावणे, फुटबॉल आदी क्षेत्रांत राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत धवल कामगिरी केली तर त्याला आणखी चांगली कामगिरी करण्याकरिता प्रोत्साहन म्हणून महापौरांच्या हस्ते सर्वसाधारण सभेत गौरव करण्याची प्रथा आहे. मात्र, गेल्या वर्षभरात कोल्हापूरच्या युवा फुटबॉलपटू ‘अनिकेत’च्या अतुलनीय कामगिरीचा विसर पडला आहे. सांस्कृतिक नगरीबरोबरच क्रीडानगरी म्हणून देशभर सर्वश्रूत असलेल्या या करवीरनगरीने आतापर्यंत अनेक खेळाडू देशाला दिले आहेत.

यात कुस्तीगीर कै. खाशाबा जाधव, कै. युवराज पाटील, हिंदकेसरी व अर्जुन पुरस्कार विजेते गणपतराव आंदळकर, महान भारत केसरी दादू चौगुले, हिंदकेसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू अर्जुनवीर शैलजा साळुंखे, नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, राधिका बराले, जलतरणपटू वीरधवल खाडे, मंदार दिवसे, आदी दिग्गजांचा समावेश आहे. त्यात आॅक्टोबर २०१७ ला भारतात झालेल्या युवा विश्वचषक फुटबॉल खेळलेला कोल्हापूर व महाराष्ट्राचा एकमेव फुटबॉलपटू म्हणून अनिकेतचा समावेश होता. त्याच्या कामगिरीची दखल घेत राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा लाख रुपये बक्षीस रूपात जाहीर केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाबरोबर त्याचाही ‘विशेष निमंत्रित’ करून गौरव केला आहे.

या सर्व सत्कारांबरोबर घरचा सत्कारही तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्याच्या सत्काराचा विसर पडणे म्हणजे कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला बाजूला ठेवण्यासारखे काम आहे. त्यामुळे महापालिका पदाधिकाऱ्यांनी त्याचा यथोचित गौरव करणे अपेक्षित आहे.सदस्य खेळाडूंनाही विसरमहापालिकेच्या लोकप्रतिनिधींमध्ये माजी राष्ट्रीय फुटबॉलपटू संभाजी जाधव, सचिन पाटील, संतोष गायकवाड, विजयसिंह खाडे हे चार फुटबॉलपटू नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यात विशेष म्हणजे महापौर स्वाती यवलुजे याही राष्ट्रीय हॉकीपटू व संघटक सागर यवलुजे यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे अनिकेतच्या कार्याचा विसर कसा पडला याबद्दल क्रीडारसिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल