शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

निपाणीतील गांधी हॉस्पिटल ‘सलाईन’वर!

By admin | Updated: July 10, 2015 21:50 IST

तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमणुकीसाठी प्रयत्नशील

राजेंद्र हजारे -निपाणी--कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमाभागातून निपाणी शहरात शेकडो रुग्ण येथील शासकीय गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत असतात. शिवाय या शहराबाहेरून राष्ट्रीय महामार्ग असल्याने दररोज लहान-मोठे अपघात होत असतात; पण या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असून, विविध कारणांमुळे गांधी हॉस्पिटलच सलाईनवर आहे.निपाणी येथे सुमारे १५ एकर जागेवर गांधी हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. सध्या हे हॉस्पिटल समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. सध्या या हॉस्पिटलमध्ये डॉ. हेब्बाळी हे प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तर सीमा गुंजाळ या एकमेव स्त्री रोगतज्ज्ञ आहेत.येथे दिवसभरात १५० ते २०० रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जातात; पण तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते. परिणामी सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक झळ पोहोचत आहे.या रुग्णालयात भूलतज्ज्ञ नसल्याने शस्त्रक्रिया करणे कठीण होत आहे. डी ग्रुप (शिपाई) पदे सात मंजूर असून, त्यापैकी केवळ तीन पदे कार्यरत आहेत. तसेच नर्स आणि कुष्ठरोग, पर्यवेक्षकपदेही रिकामी आहेत. रविवारी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही वानवा दिसली. अलीकडच्या काळात महामार्गावर अपघातांची संख्या वाढत आहे; पण गांधी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया होत नसल्याने सर्वच अपघातग्रस्तांवर प्रथमोपचार करून त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात येते. काही वर्षांपूर्वी या हॉस्पिटलमध्ये १०० कॉटचे सुसज्ज हॉस्पिटल आणि ट्रॉमाकेअर सेंटर उभारण्याची घोषणा झाली होती. पण, आजतागायत त्याच्या निर्मितीच्यादृष्टीने पावले उचलण्यात आलेली नाहीत. तरी संबंधितांना या गांधी हॉस्पिटलकडे लक्ष देऊन हॉस्पिटलला गतवैभव मिळवून देण्याची मागणी निपाणी आणि ग्रामीण भागातून होत आहे.तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमणुकीसाठी प्रयत्नशील निपाणी भागातील रुग्णांना गांधी हॉस्पिटल वरदान ठरले आहे. या ठिकाणी होणारी अडचण निदर्शनास आली आहे. विधानसभा अधिवेशनात याबाबत चर्चा करून लवकरच तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमणुकीसह अन्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार शशिकला ज्वोल्ले यांनी सांगितले.