कितीही दडपशाही करा, आंदोलन थांबणार नाही सकल मराठा समाजाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 09:58 AM2018-11-23T09:58:33+5:302018-11-23T10:05:16+5:30

‘कितीही दडपशाही करा, आरक्षणासाठीचे आंदोलन आता थांबणार नाही. फसवणूक केली तर याद राखा,’ असा इशारा सकल मराठा समाजाने कोल्हापुरात दिला. सरकारची भूमिका दिशाभूल करणारी असल्याने संपूर्ण राज्यातून सोमवारी

Much of the repression, the agitation will not stop, the message of the gross Maratha community will not stop | कितीही दडपशाही करा, आंदोलन थांबणार नाही सकल मराठा समाजाचा इशारा

कितीही दडपशाही करा, आंदोलन थांबणार नाही सकल मराठा समाजाचा इशारा

Next
ठळक मुद्देराजर्षी शाहूंच्या पुतळ्याभोवती ‘गाडी रिंगण’करून लढा सुरूसरकार आम्हाला आरक्षण देणार का? याबाबत शंका असल्याने मुंबईत आंदोलन केले जाणार आहे.

कोल्हापूर : ‘कितीही दडपशाही करा, आरक्षणासाठीचे आंदोलन आता थांबणार नाही. फसवणूक केली तर याद राखा,’ असा इशारा सकल मराठा समाजाने कोल्हापुरात दिला. सरकारची भूमिका दिशाभूल करणारी असल्याने संपूर्ण राज्यातून सोमवारी (दि. २६) मंत्रालयावर धडक गाडी मोर्चा काढण्यात येणार आहे. या लढ्याची सुरुवात मराठा समाजाने गुरुवारी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याभोवती चारचाकी वाहनांनी ‘गाडी रिंगण’द्वारे केली.

या ‘गाडी रिंगण’ आंदोलनासाठी राजर्षी शाहूंच्या पुतळ्याच्या परिसरात व्यासपीठ घालण्यास पोलिसांनी रोखले. त्यावर सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी पालकमंत्री, राज्य सरकारसह पोलिसांचा निषेध केला. यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास सकल मराठा समाज राजर्षी शाहंूच्या पुतळ्याजवळ जमला. त्या ठिकाणी ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, ‘एक मराठा लाख मराठा’ असा घोषणा देत ठिय्या मारला. यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, भाजप सरकारच्या बदलत्या भूमिकेमुळे मराठा समाजात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री म्हणतात, एक डिसेंबरला जल्लोष करा आणि पालकमंत्री पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतात की, कायद्याच्या चौकटीमध्ये आरक्षण टिकू दे. काही मंत्र्यांनी सांगितले की, आम्ही राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल वाचलेला नाही. त्यामुळे सरकारची नेमकी भूमिका आणि आरक्षणाची टक्केवारी, ते केंद्रीय परीक्षांसाठी लागू असणार का? हे स्पष्ट होत नाही. सध्या अधिवेशन सुरू असल्याने सरकारने हा अहवाल सभागृहात ठेवून स्पष्टीकरण द्यावे. आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण करून पुन्हा सत्तेवर येण्याचा भाजप सरकार डाव आखत आहे.

आरक्षणाबाबत सरकार खोटे बोलत आहे. त्याचा निषेध करण्यासह आरक्षणाचा हक्क मिळविण्यासाठी पुन्हा आंदोलनाची ठिणगी कोल्हापुरात पडली आहे. आपण सर्वजण आरक्षण मिळविण्यासाठी ताकदीने लढा देऊया. वसंतराव मुळीक म्हणाले, मंत्रिगटाच्या उपसमितीने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दि. २६ नोव्हेंबरला मुंबईत ‘गाडी मोर्चा’ होणारच आहे. दिलीप देसाई म्हणाले, पालकमंत्री, सरकारने कितीही दडपशाही केली, तरी आरक्षणासाठीचे आंदोलन थांबणार नाही. राजर्षी शाहूंच्या चरणी प्रार्थना करून आम्ही पुन्हा लढा सुरू केला आहे. इंद्रजित सावंत म्हणाले, आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणा करीत आहे. सरकार आम्हाला आरक्षण देणार का? याबाबत शंका असल्याने मुंबईत आंदोलन केले जाणार आहे.

या ‘गाडी रिंगणा’च्या प्रारंभी शिवशाहीर दिलीप सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोवाडा सादर केला. यानंतर उपस्थित मराठा बांधवांनी ‘राजर्षी शाहूं’च्या पुतळ्याभोवती चारचाकी वाहनांचे रिंगण करून प्रदक्षिणा घातली. या आंदोलनात कादर मलबारी, जयेश कदम, अजित राऊत, सुभाष जाधव, रविकिरण इंगवले, विद्या साळोखे, संयोगिता देसाई, शशिकांत पाटील, सचिन तोडकर, किशोर घाटगे, सुरेश कुराडे, संजय पाटील, अवधूत पाटील, स्वप्निल पार्टे, किरण पडवळ, कमलाकर किलकिले, तौफिक मुल्लाणी, दीपक थोरात, आदी सहभागी झाले.


एवढा बंदोबस्त कशाला?
या आंदोलनात आमदार सतेज पाटील म्हणाले, मराठा समाजाकडून शांततेत आंदोलन केले जाते. त्यामुळे आज या ठिकाणी एवढा बंदोबस्त कशाला ठेवला आहे? त्याऐवजी शहरात होणाऱ्या घरफोड्या रोखण्याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे. दडपशाहीने आंदोलन थांबत नाही. मागण्या मान्य करूनच आंदोलन थांबविता येते, हे सरकारने लक्षात घ्यावे. जिल्ह्यातील आम्ही सर्व आमदार मराठा समाजाबरोबर आहेत.

दसरा चौकातून निघणार ‘गाडी मोर्चा’
दसरा चौकात सोमवारी (दि. २६) सकाळी नऊ वाजता मुंबईतील गाडी मोर्चासाठी समाजबांधव निघणार आहेत. पुढे त्यामध्ये सांगली, साताºयातील बांधव सहभागी होणार आहेत. या आंदोलनाबाबत समाजात चेतना निर्माण करण्यासह सरकारला इशारा देण्यासाठी कोल्हापुरात ‘गाडी रिंगण’ आंदोलन करण्यात आले असल्याचे इंद्रजित सावंत यांनी सांगितले.

Web Title: Much of the repression, the agitation will not stop, the message of the gross Maratha community will not stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.