शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज विभागात महावितरणची २० दिवसात १.५० कोटीची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 17:11 IST

mahavitaran News Kolhapur- कोरोनामुळे गडहिंग्लज विभागातील ग्राहकांकडून महावितरणची १५ कोटीची वीजबीले थकित आहेत. त्याच्या वसुलीसाठी सुरू असलेल्या घर-टू-घर संपर्क मोहिमेस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अवघ्या २० दिवसात साडेतीन हजार ग्राहकांकडून तब्बल दीड कोटीची वसुली झाली.

ठळक मुद्देगडहिंग्लज विभागात महावितरणची २० दिवसात १.५० कोटीची वसुलीवीज बिलांची थकबाकी : अधिकारी-कर्मचाऱ्यांची घर-टू-घर संपर्क मोहिम

राम मगदूम

 गडहिंग्लज :कोरोनामुळे गडहिंग्लज विभागातील ग्राहकांकडून महावितरणची १५ कोटीची वीजबीले थकित आहेत. त्याच्या वसुलीसाठी सुरू असलेल्या घर-टू-घर संपर्क मोहिमेस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अवघ्या २० दिवसात साडेतीन हजार ग्राहकांकडून तब्बल दीड कोटीची वसुली झाली.गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक मिळून १ लाख ३५ हजार वीजग्राहक आहेत. त्यापैकी ४० हजार ७१४ ग्राहकांनी १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२० अखेर एकही बील भरलेले नाही. त्यामुळे थकबाकी १५ कोटीवर गेली. त्याच्या वसुलीसाठी विशेष मोहिम राबवली जात आहे.पहिल्या टप्यात सरपंच ते आमदारांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींची भेट घेवून वसुलीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, गाववार मेळावे घेवून वीजग्राहकांचे प्रबोधन करण्यात आले. त्यानंतर आता घर-टू-घर मोहिम सुरू आहे. एकूण थकबाकीपैकी ३२ टक्के रक्कम भरणाऱ्यांना उर्वरित रक्कम भरण्यासाठी सोयीचे हप्ते पाडून दिले जात आहेत.प्रभारी कार्यकारी अभियंता संजय पोवार यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लजचे उपकार्यकारी अभियंता सागर दांगट, नेसरीचे संदीप दंडवते, आजºयाचे दयानंद कामतगी, चंदगडचे विशाल लोधी व त्यांचे सर्व सहकारी मोहिमेत सक्रीय सहभागी झाले आहेत.तालुकानिहाय थकबाकी व वसुली कंसात लाखात

  •  गडहिंग्लज : ५.८८ कोटी (५८.३०)
  • आजरा - २.७४ कोटी (४१.८५)
  • चंदगड - ६.३८ कोटी (४७.४७)

 एप्रिल ते नोव्हेंबरअखेर एकही बील न भरलेले ग्राहक तालुकानिहाय असे

  • गडहिंग्लज - १६२८५
  • आजरा - ६७३६
  • चंदगड - १७६९३

दिवसात अडीच लाख जमाशनिवारी (१९) सर्वाधिक ४३६१ ग्राहक आणि १ कोटी २६ लाख ६५ हजार थकबाकी असलेल्या चंदगड तालुक्यातील हलकर्णी शाखेतंर्गत येणाऱ्या गावातील संपर्क मोहिमेत १५० ग्राहकांच्या भेटी घेण्यात आल्या. त्यापैकी ४० ग्राहकांनी अडीच लाख रूपये जमा केले तर ४० ग्राहकांनी सोयीचे हप्ते मागून घेतले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूरCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक