मृदुल शिंदे ;‘बेंड इट लाईक बेकहॅम’!
By Admin | Updated: March 8, 2017 00:10 IST2017-03-08T00:10:04+5:302017-03-08T00:10:04+5:30
सध्या विद्यापीठात ती सोसिआॅलॉजी या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे.

मृदुल शिंदे ;‘बेंड इट लाईक बेकहॅम’!
इंदुमती गणेश -- कोल्हापूर
फुटबॉल हे क्षेत्र मुलींचे नाही अशा पारंपरिक विचारसरणीला मागे सारत मृदुल शिंदेने कोल्हापुरातील एकमेव महिला फुटबॉल प्रशिक्षकापर्यंतची भरारी घेतली आहे. परदेशातील फुटबॉल ग्राऊंडवर आपल्या खेळाची चमक दाखविलेल्या मृदुलला कोल्हापुरात महिला फुटबॉल खेळाडूंची फळी तयार करायची आहे. मृदुलची आई ऐश्वर्या या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर आणि बास्केटबॉलपटू, तर वडील डॉ. श्रीकांत शिंदे यांना टेबल टेनिस आणि बॅडमिंटनची आवड. शालेय शिक्षण प्रायव्हेट हायस्कूलमध्ये घेत असताना मृदुलला खेळाडूंची जर्सी, स्पोर्टस् शूजचे भारी आकर्षण होते. त्यासाठी तिने फुटबॉल खेळायला सुरुवात केली. नंतर तिला याच खेळात रस निर्माण झाला आणि त्यांच्या टीमने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांपर्यंत मजल मारली. तीन वर्षांपूर्वी तिची आंतरराष्ट्रीय युएसए वॉशिंग्टन डीसी येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली. फुटबॉल खेळत असतानाच तिने रेफ्री आणि प्रशिक्षक असे दोन्ही प्रशिक्षण कोर्स पूर्ण केले आहेत. ‘एआयएफएफ’ची प्रशिक्षक म्हणून ती लायसेन्सधारक आहे. एफझेडएफए यूथ कोचिंग कोर्स, ‘विफा’चा प्रशिक्षकाचा कोर्सही तिने पूर्ण केला आहे. सध्या विद्यापीठात ती सोसिआॅलॉजी या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे.