पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी नदीत उतरून आंदोलन, रूकडीतील सामाजिक कार्यकर्त्यांची प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयावर धडक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 03:50 PM2024-03-01T15:50:45+5:302024-03-01T15:52:33+5:30

अभय व्हनवाडे  रूकडी माणगाव : पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करा यासाठी रूकडी येथील सामाजिक कार्यकर्ते अमितकुमार भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली ...

Movement of social activists from Rukadi by descending into the river for Panchganga pollution relief | पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी नदीत उतरून आंदोलन, रूकडीतील सामाजिक कार्यकर्त्यांची प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयावर धडक 

पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी नदीत उतरून आंदोलन, रूकडीतील सामाजिक कार्यकर्त्यांची प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयावर धडक 

अभय व्हनवाडे 

रूकडी माणगाव : पंचगंगा नदीप्रदूषण मुक्त करा यासाठी रूकडी येथील सामाजिक कार्यकर्ते अमितकुमार भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली युवकांनी रूकडी बंधारा येथे ‌नदीत उतरून आंदोलन केले. नदी प्रदूषण संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळास वारंवार निवेदन व आंदोलन करुन ही उपाययोजना करत नसल्याने निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

रूकडी गावास पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा होतो. पण गेली दहा दिवस पंचगंगा नदी अती प्रदूषणे ग्रासली आहे. दि 22 फ्रेबुवारी रोजी येथील बंधारात मृत माशांचा खच पडल्याने  दुर्गंधी  सह नदीस गटारांची स्वरूप आले होते. मृत माशांचे दुर्गंधी कमी होताच नदीत केंदाळ आल्याने नदी प्रदूषित होत आहे. प्रतिवर्षी फेब्रुवारीच्या दरम्यान येथील पंचगंगा नदीत केंदाळ येण्याचा व मासे मृत होण्याचे घटना‌ वारंवार घडत‌ असतात. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करत असते. अस्वच्छ पाण्यामुळे पिण्याच्या पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.

आंदोलनामध्ये अमर आठवले, नितिन कांबळे, सुनील भारमल, ओंकार किणींगे, मनोज कोळी, रमेश शिंदे, प्रवीण लंबू, सतीश मगदुम, शामराव कोळी, शकील पठान, प्रसाद गवळी, शिवाजी रेंदाले सहभागी झाले होते.

Web Title: Movement of social activists from Rukadi by descending into the river for Panchganga pollution relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.