शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

आॅनलाईन व्यापारविरोधात बिंदू चौकात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 4:16 PM

कोल्हापूर : आॅनलाईन व्यापाराविरोधात कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजच्यावतीने बुधवारी सकाळी बिंदू चौकात धरणे आंदोलन करुन निदर्शने करण्यात ...

ठळक मुद्दे‘गो बॅक’ घोषणांनी ‘कोल्हापूर चेंबर’ची निदर्शने,काळे झेंडे दाखवून निषेध आॅनलाईन व्यापारविरोधात व्यापारी संघटनेचे पाऊल

कोल्हापूर : आॅनलाईन व्यापाराविरोधात कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजच्यावतीने बुधवारी सकाळी बिंदू चौकात धरणे आंदोलन करुन निदर्शने करण्यात आली. ‘गो बॅक, आॅन लाईन व्यापार हटवा- व्यापार वाचवा’ अशा घोषणा दिल्या. कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे हे आंदोलन करण्यात आले.अमेझॉन या आॅनलाईन कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस हे बुधवारी भारत भेटीवर येत असून ते आॅनलाईन कंपनीच्या काळ्या कर्तुत्वावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे  आॅनलाईन कंपन्यांच्या व्यापारास विरोध म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशभरात सर्व राज्यातील शहरात कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सच्यावतीने काळे झेंडे दाखवून हल्लाबोल धरणे आंदोलन, निदर्शने करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार बुधवारी बिंदू चौकात कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅड इंडस्ट्रीजच्यावतीने धरणे आंदोलन करत निदर्शने करण्यात आली.आंदोलकांच्या हातात हल्लाबोल, गो-बॅक असे काळ्या रंगातील फलक होते. तर आॅनलाईन व्यापार हटवा, व्यापार वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या. काळे झेंडेही दाखविण्यात आले. या आंदोलनात ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे, माजी अध्यक्ष आनंद माने, प्रदीपभाई कापडीया तसेच संजय पाटील, धनंजय दुग्गे, अजित कोठारी, वसंतराव देशमुख, हरिभाई पटेल, राहूल नष्टे, वैभव सावर्डेकर, संभाजीराव पोवार, धैर्यशील पाटील, प्रशांत शिंदे आदींचा सहभाग होता.

 

 

टॅग्स :onlineऑनलाइनkolhapurकोल्हापूर