शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत’ला कोथळीतून पाण्यासाठी हालचाली : कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यांतून होणार विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:17 IST

संतोष बामणे।उदगाव : इचलकरंजी शहरासाठी दानोळी (ता. शिरोळ) येथून विरोध झाल्यानंतर आता कोथळी-हरिपूर येथील कृष्णा-वारणा नदीच्या संगमावरून पाणी नेण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. तर २२ मे रोजी मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत हा मुद्दा मांडणार असल्याचे समजल्यानंतर, आता शिरोळ तालुक्यातील दानोळीनंतर कोथळी व सांगली जिल्हा एकवटणार आहे. त्यामुळे वारणा नदीतून इचलकरंजी ...

ठळक मुद्देमंगळवारच्या बैठकीत मांडणार मुद्दा

संतोष बामणे।उदगाव : इचलकरंजी शहरासाठी दानोळी (ता. शिरोळ) येथून विरोध झाल्यानंतर आता कोथळी-हरिपूर येथील कृष्णा-वारणा नदीच्या संगमावरून पाणी नेण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. तर २२ मे रोजी मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत हा मुद्दा मांडणार असल्याचे समजल्यानंतर, आता शिरोळ तालुक्यातील दानोळीनंतर कोथळी व सांगली जिल्हा एकवटणार आहे. त्यामुळे वारणा नदीतून इचलकरंजी शहराला पाणी देणार नाही. या मागणीवर वारणाकाठची जनता ठाम असून, कोथळीतून एकही इंच जमीन न देण्याचा निर्णय कोथळी येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.

दानोळी येथील वारणा बचाव समितीने पुढाकार घेतल्यानंतर वारणाकाठावरील मोठ्या संख्येने गावे एकवटली व इचलकरंजी शहराच्या ‘अमृत’ योजनेला विरोध केला. सध्या वारणा बचाव कृती समितीने गावागावांत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्या पाठोपाठच इचलकरंजीनेही उपोषणाला सुरुवात केली आहे. अशातच लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने कोणता तोडगा काढायचा व कोणत्या पद्धतीने इचलकरंजी शहरासाठी पाणी देता येईल, अशा योजना आखल्या जात आहेत. त्यामुळे आता दानोळीकरांनी विरोध दर्शविल्यानंतर कोथळी येथील कृष्णा-वारणा संगम ठिकाणावरून इचलकरंजी शहरासाठी पाणी नेण्याचा घाट रचला जात आहे.

तर मुंबई येथे २२ मे रोजी ‘अमृत’ योजनेच्या समन्वयासाठी बैठक बोलविण्यात आली आहे. त्यामुळे कोथळी-हरिपूर येथील वारणा-कृष्णा संगमाच्या डोहातून इचलकरंजीची अमृत योजना व्हावी, असा मुद्दा मांडला जाणार आहे. तर सध्या हा मुद्दा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांच्या चर्चेत आल्यानंतर सांगलीचे माजी केंद्रीयमंत्री प्रतीक पाटील यांनी काहीही झाले तरी इचलकरंजी शहराला कोथळी-हरिपूर येथून पाणी द्यायचे नाही, या भूमिकेवर ठाम असून, सांगली जिल्हाही वारणा बचाव कृती समितीच्या म्हणण्यावर ठाम आहे. तसेच इचलकरंजी शहराला जर संगमातून पाणी दिले, तर ताकारी, म्हैसाळसारख्या योजनांना पाण्याची कमतरता भासणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सर्वच गावे अमृत योजनेविरोधात एकवटत आहेत.

तर इचलकरंजी शहरासाठी दानोळीनंतर कोथळी गावातून ‘अमृत’ योजना न्यायची झाल्यास गावातून एक इंचही जमीन मिळणार नाही, या भूमिकेवर नागरिक ठाम आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कृष्णा-वारणा संगमातून इचलकरंजी शहराला पाणी देणार नाही, अशी जनतेची भूमिका आहे. सध्या वारणाकाठाबरोबर कृष्णाकाठावर असलेल्या उमळवाड, उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड, अंकली, हरिपूर, धामणी यासह अनेक गावांनी पुढाकार घेतला असून, संगमातूनही पाणी मिळणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे जर इचलकरंजीच्या लोकप्रतिनिधींनी दानोळीनंतर आता कोथळी गावाचा विचार केला असेल, तर कोथळीच्या ग्रामस्थांनी ‘अमृत’ योजनेच्या विरोधात चांगलीच मोट बांधली आहे.नगरसेवकांच्या जमिनीला पाणीकृष्णा नदीतून मजरेवाडी (ता. शिरोळ) येथून इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा केला जातो. इचलकरंजीतील नगरसेवकांनी शिरढोण व टाकवडे परिसरात जमिनी घेतल्या आहेत. त्या जमिनींना पाणीपुरवठा करण्यासाठी इचलकरंजी शहराच्या पाईपलाईनमधून शेतीला पाणीपुरवठा केला जातो. मग गळतीही नगरसेवकांच्या घरात मुरत आहे आणि वारणाकाठच्या लोकांना वेठीस धरून आमच्या हक्काचे पाणी नेण्याचा प्रयत्न केल्यास शिरोळची जनता गप्प बसणार नसल्याचे आमदार उल्हास पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.वारणाकाठावरून इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना इचलकरंजी शहराला वारणेचे पाणी कशासाठी पाहिजे. सध्याची मजरेवाडीतून असलेली कृष्णा योजनेची पाईपलाईन दुरुस्त करून घ्यावी. त्याचबरोबर पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करून इचलकरंजी शहराला पाणी घ्यावे. आता जर इचलकरंजीच्या लोकप्रतिनिधींनी जर कोथळीवर डोळा ठेवला असेल तर जनता गप्प बसणार नाही.- संजय नांदणे, कोथळी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater shortageपाणीटंचाई