मोटरसायकलची टेंपोस धडक; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 17:17 IST2020-12-31T17:15:18+5:302020-12-31T17:17:33+5:30
accident kolhapur- राशिवडे येळवडे दरम्यानच्या नाल्यावरील पुलावर मोटर सायकलस्वार टेंपोला धडकून झालेल्या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी दहाच्या दरम्यान झाला. शिवाजी दत्तात्रय कुलकर्णी (वय ५५) पुंगाव ता. राधानगरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मोटरसायकलची टेंपोस धडक; एक ठार
राशिवडे : राशिवडे येळवडे दरम्यानच्या नाल्यावरील पुलावर मोटर सायकलस्वार टेंपोला धडकून झालेल्या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी दहाच्या दरम्यान झाला. शिवाजी दत्तात्रय कुलकर्णी (वय ५५) पुंगाव ता. राधानगरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिस व अपघात स्थळावरून मिळालेली माहिती अशी, शिवाजी कुलकर्णी हे पुंगाव हून राशिवडे येथे सिलेंडर आणण्यासाठी मोटरसायकल वरुन येत होते. तर राशिवडे हून तारळे येथे बाजारासाठी माल वाहतूक करणारा टेंपो चालला होता.
सारजाईच्या नाल्यावर आले असता मोटरसायकलने बाजूच्या वाहनास ओव्हरटेक करत समोरून येणाऱ्या टेंपोला धडक दिली. या अपघातात शिवाजी कुलकर्णी यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जागीच ठार झाले. अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती. राधानगरीचे पोलिस अधिक तपास करत आहेत.
या अपघातात शिवाजी कुलकर्णी यांचा उजवा पाय मोडला होतो तर डोक्याला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी हेल्मेट घातले असते तर त्यांचा जीव वाचला असता अशी चर्चा अपघातात स्थळी होत होती.