मोतीवाला यांचा रत्नशास्त्री पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:21 IST2021-04-05T04:21:35+5:302021-04-05T04:21:35+5:30
निपाणी येथील सुप्रसिद्ध रतनशास्त्री ए.एच. मोतीवाला यांना नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र कोल्हापूर यांच्यावतीने रत्नशास्त्री या पुरस्काराने गौरविण्यात आले. ...

मोतीवाला यांचा रत्नशास्त्री पुरस्कार
निपाणी येथील सुप्रसिद्ध रतनशास्त्री ए.एच. मोतीवाला यांना नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र कोल्हापूर यांच्यावतीने रत्नशास्त्री या पुरस्काराने गौरविण्यात आले. संजय घोडावत विद्यापीठात हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले होते.
पुरस्कार स्वीकारून ए.एच. मोतीवाला म्हणाले की, कै. एच. ए. मोतीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली आपणही शुभरत्न केंद्र चालवत आहोत. गेल्या सहा पिढ्या या व्यवसायात असून लोकांच्या समस्या रत्नशास्त्राच्या आधारे सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. यामुळेच आज या व्यवसायात आम्ही विश्वास निर्माण केला आहे. फक्त व्यावसायिक धोरण न ठेवता समाजातील गरजू लोकांना मदतही केली आहे. या पुरस्काराने नवी जबाबदारी वाढली असून अधिक जोमाने समाजसेवा करू, असे ते म्हणाले.
संजय घोडावत विद्यापीठाचे प्रा. गिरी, तेजस्विनी पाटील, नुसरत शहानुर मुजावर, नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉ. सुभाष सामंत, उपाध्यक्ष विनयकुमार पाटील, सचिव शेखर धोंगडे, जिल्हा कार्याध्यक्ष पोपटराव वाकसे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो : रत्नशास्त्री ए.एच. मोतीवाला यांचा रत्नशास्त्री या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.