सांगवडे : मुलाच्या निधनाच्या धक्क्याने काही तासातच आईचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोल्हापुरात घडली. या घटनेने बिरांजे कुटुंबियांना मोठा धक्का बसला. मुलाच्या चितेची अग्नि शांत होण्याआधीच आईने जीव सोडल्याने सांगवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्वप्निल ऊर्फ अनिल कुमार बिरांजे (वय ३५) आणि माया कुमार बिरांजे (५५) अशी मृत माय-लेकांची नावे आहेत.स्वप्निलचे रविवारी (दि,१९) दुपारच्या सुमारास अचानक निधन झाले. काही दिवसापूर्वीच त्याची आई माया बिरांजे या माहेरी गेल्या होत्या. मुलाचा मृत्यू झाल्याचे समजतात त्या गावी परतल्या. आज, सोमवारी सकाळी स्वप्निलच्या रक्षाविसर्जनासाठी ग्रामस्थ, नातेवाईक जमले होते. तोच मुलाच्या विरहाने व्याकुळ झालेल्या मातेनेही आपले प्राण सोडले. त्यामुळे आई आणि मुलाचे एकाच वेळी रक्षाविसर्जन करण्याची दुदैवी वेळ कुटुंबीय व नातेवाईकावर आली.स्वप्निल एका खासगी कंपनीत कामाला होता. त्याच्या पश्चात दोन मुले, वडील, भाऊ आणि दोन विवाहित बहिनी असा परिवार आहे. या घटनेमुळे सांगवडे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
Web Summary : In a tragic Kolhapur incident, a mother died hours after her son's sudden death. Maya Biranje, 55, passed away from grief shortly before her son's funeral rites. The community mourns the double loss of the Biranje family.
Web Summary : कोल्हापुर में एक दुखद घटना में, बेटे की अचानक मौत के कुछ घंटों बाद ही माँ ने भी सदमे से प्राण त्याग दिए। 55 वर्षीय माया बिरांजे ने अपने बेटे के अंतिम संस्कार से ठीक पहले दुख के कारण दम तोड़ दिया। बिरांजे परिवार के दोहरे नुकसान पर समुदाय शोक में है।