शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

बहुतांश तालुक्यांत दिव्यांग साहित्य जुळणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 2:34 PM

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’अंतर्गत साहित्य वितरणाच्या कार्यक्रमाची वेगाने तयारी सुरू आहे. ज्या तालुक्यांना याआधी साहित्य पाठविण्यात आले होते, त्या ठिकाणी साहित्याची जुळणीही सुरू असून, नव्या साहित्याचे ट्रकही दाखल होत आहेत.

ठळक मुद्देबहुतांश तालुक्यांत दिव्यांग साहित्य जुळणीला वेगनव्या साहित्याचे ट्रक दाखल, जिल्हा परिषदेत युद्धपातळीवर तयारी

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्यादिव्यांग उन्नती अभियान’अंतर्गत साहित्य वितरणाच्या कार्यक्रमाची वेगाने तयारी सुरू आहे. ज्या तालुक्यांना याआधी साहित्य पाठविण्यात आले होते, त्या ठिकाणी साहित्याची जुळणीही सुरू असून, नव्या साहित्याचे ट्रकही दाखल होत आहेत.केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले आणि रतनलाल कटारिया यांच्या हस्ते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी (दि. २५) सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजामाता पदवीदान सभागृहामध्ये या साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाची तारीख निश्चित झाल्यानंतर लगेचच अ‍ॅल्मिको कंपनीचे सात तंत्रज्ञ कोल्हापुरात दाखल झाले असून, त्यांनी गेल्या आठ दिवसांपासून विविध पंचायत समित्यांमध्ये ठेवलेल्या साहित्याची जुळणी करण्यास सुरुवात केली आहे. शिरोळ, हातकणंगले, चंदगड, आजरा येथील साहित्य जुळविण्यात आले आहे; तर कागल येथे हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी रुपयांचे साहित्य आले होते आणि सहा कोटी रुपयांचे साहित्य येण्यास सुरुवात झाली आहे.कोल्हापूरशेजारील करवीर, कागल, हातकणंगले येथून अधिकाधिक दिव्यांगांना या कार्यक्रमासाठी आणण्यात येणार असून, उर्वरित तालुक्यांमधूनही दिव्यांग येणार आहेत. त्यांच्यासाठी एस. टी. बसेसची सोय करण्यात आली आहे. प्रत्यक्ष व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते २५ दिव्यांगांना साहित्य वितरित केले जाणार आहे. याच परिसरात १२ स्टॉलवरून दिव्यांगांना साहित्य दिले जाणार आहे.

प्रत्येक तालुक्यात कार्यक्रमया मुख्य कार्यक्रमामध्ये सर्वांनाच साहित्य देता येणार नसल्याने २६ फेब्रुवारी ते पुढे १० दिवस प्रत्येक तालुक्यात हे साहित्य वितरित करण्याचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. त्यासाठीही नंतर लगेचच पंचायत समित्यांकडून नियोजन करण्यात येणार आहे. मुख्य कार्यक्रमाआधी दिव्यांग मुलामुलींचा सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केला जाणार आहे.विविध समित्यांची स्थापनाहा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेने १२ समित्यांची स्थापना केली आहे. कार्यक्रम संनियंत्रण समितीपासून भोजन, वाहतूक, बैठक, आरोग्य अशा या समित्या असून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागप्रमुखाकडे यातील जबाबदारी देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्याकडे प्रमुख संनियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदDivyangदिव्यांगkolhapurकोल्हापूर