संदीप आडनाईककोल्हापूर : अलीकडे कोल्हापुरातील सिनेमागृहांमध्ये सकाळच्या शोची नव्याने क्रेझ निर्माण झाली असून, बदलत्या प्रेक्षकवर्गाची ही नवी पसंती मानली जात आहे. या सकाळच्या लवकरच्या शोला देखील चांगली गर्दी पाहायला मिळत आहे. सामान्यतः दुपार आणि संध्याकाळच्या शोला जास्त प्रतिसाद मिळतो, मात्र या सिनेमाने तो ट्रेंड बदलल्याचे चित्र आहे.गुरुवारी प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर २' या नव्या सिनेमाचा चार तासांचा मोठा कालावधी सिनेमागृह मालकांसाठी आव्हान ठरला आहे. ट्रेलर, जाहिराती, मध्यांतर आणि दोन्ही शोमधील वेळेसह, सिनेमागृह मालक प्रत्येक शोसाठी अंदाजे चार तास चाळीस मिनिटे राखून ठेवत आहेत. सामान्य परिस्थितीत बहुतेक पडद्यांवर दिवसाला फक्त चारच शो होऊ शकतात. मागणीतील ही वाढ पूर्ण करण्यासाठी, कोल्हापूरसह राज्यातील बहुतेक मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन असलेल्या सिनेमागृहचालकांनी सकाळी ६.४५, ७.१५, ७.४५ अशा लवकर वेळांचे अधिकाधिक शो लावण्याचा पर्याय निवडला आहे. शिवाय गुढीपाडवा आणि रमजान ईद या सणाचाही प्रभाव सिनेरसिकांवर आहेच. राज कपूर यांच्या 'संगम' सिनेमासाठीही यापूर्वी सिनेमागृहांनी वेळा बदलल्या होत्या.सकाळी शोचे दर तुलनेने कमीसकाळच्या शोचे दर तुलनेने कमी असतात. त्यामुळे १०० ते २०० रुपयांच्या दरात प्रेक्षकांना सिनेमा पाहण्याची संधी मिळते. यामुळे अनेक जण सकाळचे शो पसंत करत आहेत. कमी गर्दी, स्वस्त तिकीट आणि शांत वातावरण या कारणांमुळे सकाळचा हा शो ‘स्मार्ट चॉईस’ ठरला आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगारांची पसंतीप्रामुख्याने तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच ज्यांची सेकंड आणि थर्ड शिफ्ट असते असे कामगार या सिनेमासाठी वेळ काढत आहेत. शिवाय काही सिनेरसिक ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’चा अनुभव घेण्यासाठीही पहाटेच थिएटरमध्ये पोहोचतात. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर ट्रेंड आणि मित्रमंडळींचा प्रभाव यामुळे तरुणाईमध्ये या सिनेमाबद्दल उत्सुकता वाढली आहे अशी प्रतिक्रिया सिनेमा अभ्यासक नितीन दातार यांनी दिली.
Web Summary : Kolhapur cinemas see rising morning show popularity, driven by lower prices, college students, workers, and 'first day' excitement. Single screens and multiplexes are adding early shows.
Web Summary : कोल्हापुर के सिनेमाघरों में सुबह के शो की लोकप्रियता बढ़ रही है, जिसकी वजह कम कीमत, कॉलेज के छात्र, कामगार और 'फर्स्ट डे फर्स्ट शो' का उत्साह है। सिंगल स्क्रीन और मल्टीप्लेक्स सुबह के शो बढ़ा रहे हैं।