मोकाट कुत्र्यांची झुंडशाही! . नागरिकांत दहशत : अनेकजण जखमी; प्रशासकीय यंत्रणा मात्र सुस्तच-कुत्र्यांचा जोर... नागरिकांना घोर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 01:12 AM2018-07-07T01:12:41+5:302018-07-07T01:13:29+5:30

जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे पिसाळलेले कुत्रे चावल्याच्या बातम्या येत आहेत. शहर व जिल्ह्यात या भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. मात्र याची पर्वा ना महानगरपालिेकला, ना नगरपालिका, ना ग्रामपंचायतीला आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा विषय गंभीर बनला आहे. या कुत्र्यांच्या दहशतीचा वेध घेणारी मालिका आजपासून...

 Mokat Dog Shot! . Citizens Panic: Many injured; The administrative machinery is lazy and the dogs are afraid ... the people are scared. | मोकाट कुत्र्यांची झुंडशाही! . नागरिकांत दहशत : अनेकजण जखमी; प्रशासकीय यंत्रणा मात्र सुस्तच-कुत्र्यांचा जोर... नागरिकांना घोर.

मोकाट कुत्र्यांची झुंडशाही! . नागरिकांत दहशत : अनेकजण जखमी; प्रशासकीय यंत्रणा मात्र सुस्तच-कुत्र्यांचा जोर... नागरिकांना घोर.

googlenewsNext

जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे पिसाळलेले कुत्रे चावल्याच्या बातम्या येत आहेत. शहर व जिल्ह्यात या भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. मात्र याची पर्वा ना महानगरपालिेकला, ना नगरपालिका, ना ग्रामपंचायतीला आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा विषय गंभीर बनला आहे. या कुत्र्यांच्या दहशतीचा वेध घेणारी मालिका आजपासून...

चंंद्रकांत कित्तुरे ।
कोल्हापूर : शिरोलीत (ता. हातकणंगले) मंगळवारी २७ जणांना कुत्र्याने चावा घेतला. सोमवारी हळदीत (ता. करवीर) कुत्र्याने दोघाजणांना जखमी केले. कोल्हापूर शहरातही पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेवून जखमी केले आहे. दहा-बारा दिवसांपूर्वी जयसिंंगपूर येथे सलग तीन दिवस पिसाळलेले कुत्रे धुमाकूळ घालत होते. येथे रेबीजची लागण होऊन एका तरुणाचा मृत्यूही झाला आहे. अशा घटना घडल्यानंतर दोन-चार दिवस त्या परिसरात कुत्री पकडण्याची मोहीम राबविली जाते. त्यानंतर सारे काही शांत होते.

भटक्या कुत्र्यांची समस्या इतकी गंभीर असूनही कायमस्वरुपी इलाज करण्याचा प्रयत्न आजपर्यंत झालेला नाही. नागरिकांना रात्री शहरात जीव मुठीत धरूनच फिरावे लागते. कारण कोपऱ्या-कोपºयावर विशेषत: चिकन, मटनाची दुकाने, चायनीजचे गाडे जिथे आहेत. त्या परिसरात ही कुत्री टोळीने असतात. मुले किंवा माणूस दिसला की हल्ला करतात.

गेल्या आठ वर्षांत नसबंदीच नाही
मोकाट कुत्र्यांना आवर घालण्यासाठी त्यांच्यावर विषप्रयोग करण्याला किंवा त्यांना ठार मारण्याला कायद्याने बंदी आहे. त्यामुळे अशा कुत्र्यांची नसबंदी करुन त्यांचे प्रजोत्पादन होवू न देणे हाच एकमेव उपाय आहे. पण हा उपाय खर्चिक असल्याने त्याचा अवलंब केला जात असल्याचे अपवादानेच दिसते. महापालिकेने तर २००९-१० मध्ये कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम राबविली होती. त्यानंतर तब्बल आठ वर्षे याकडे दुर्लक्ष केले आहे. या आठ वर्षात कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमारात वाढली आहे.

२० हजारांवर कुत्री; महापलिकेला पत्ताच नाही
केवळ कोल्हापूर शहरात २० हजारांवर भटकी कुत्री असल्याचे पशुसंवर्धन विभागाची २०१५ ची आकडेवारी सांगते. महापालिकेकडे मात्र शहरातील भटक्या कुत्र्यांची आकडेवारीच उपलब्ध नसल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. २०१२ च्या पशूगणनेनुसार कोल्हापूर शहर व जिल्ह्यात मिळून एकूर ४३ हजार ७६७ कुत्री आहेत. गेल्या सहा वर्षात या कुत्र्यांची संख्या किमान दुप्पट झाली असावी असा स्वयंसेवी संस्थांचा अंदाज आहे. यावरुन या प्रकरणाचे गांभीर्य समजते.

निधीचा अडसर : मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी स्वतंत्र आॅपरेशन थिएटर, स्वतंत्र डॉक्टर आणि त्यांना सहाय्यक कर्मचारी तसेच कुत्री पकडण्यासाठी डॉगव्हॅनची आवश्यकता असते. त्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी लागतात. महापालिकेने गेल्या आठ वर्षात यातले काही केले नाही. नाही म्हणायला कुत्री पकडण्यासाठी कर्मचाºयांचे एक पथक आणि एक डॉग व्हॅन होती. मात्र ती ही चांगल्या दर्जाची नव्हती. या पथकासाठी स्वतंत्र निधीची तरतूद नसणे ंहेच यामागचे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येते. अखेर जीवरक्षा अ‍ॅनिमल ट्रस्ट केअर या स्वयंसेवी संस्थेने मोफत शस्त्रक्रिया करण्याची तयारी दर्शविल्यानंतर महापलिकेने जून महिन्यापासून नसबंदीस सुरुवात केली आहे. (क्रमश:)

 

Web Title:  Mokat Dog Shot! . Citizens Panic: Many injured; The administrative machinery is lazy and the dogs are afraid ... the people are scared.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.