मोक्कातील फरारी संशयितास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:45 IST2021-02-06T04:45:49+5:302021-02-06T04:45:49+5:30
कोल्हापूर : ‘मोक्का’अंतर्गत कारवाई होऊनही तीन वर्षांपासून फरारी असणारा सराईत गुन्हेगार हरिकिशन नंदकिशोर पुरोहित (वय ३९, रा. वृंदावन बिल्डिंग, ...

मोक्कातील फरारी संशयितास अटक
कोल्हापूर : ‘मोक्का’अंतर्गत कारवाई होऊनही तीन वर्षांपासून फरारी असणारा सराईत गुन्हेगार हरिकिशन नंदकिशोर पुरोहित (वय ३९, रा. वृंदावन बिल्डिंग, इचलकरंजी) यास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शुक्रवारी जेरबंद केले.
पोलीस रेकाॅर्डवरील फरारी गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी एक पथक नेमले होते. त्या पथकाकडून शहापूर, इचलकरंजी येथील लाखे या मोक्का टोळीतील तीन वर्षांपासून फरारी असलेला पुरोहित याचा शोध सुरू होता. हातकणंगले येथील एका कारखान्याजवळ तो येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, उपनिरीक्षक विनायक सपाटे, असिफ कलायगार, सुरेश पाटील, विनोद कांबळे, प्रदीप नाकील, अमर वासुदेव यांनी पार पाडली.
फोटो : ०५०२२०२१-कोल-हरिकिशन पुरोहीत (आरोपी)