Mobile theft case at Jaisingpur police station | जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील मोबाईल चोरीचा छडा

जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील मोबाईल चोरीचा छडा

ठळक मुद्देजयसिंगपूर पोलीस ठाण्यातील मोबाईल चोरीचा छडाचोरटा रेकॉर्डवरील गुन्हेगार

जयसिंगपूर : जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील मोबाईल चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीसांनी चोरट्यास गजाआड केले आहे.

रघुनाथ बाळासो कदम( रा. राजीव गांधी नगर जयसिंगपूर )असे त्याचे नाव आहे चोरीचा मुद्देमाल अर्जुनवाड( ता. शिरोळ) येथील येथे कृष्णा नदीच्या पात्रात टाकण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक किशोर काळे व पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी दिली.

चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी यंत्रणा गतिमान केली आहे. गुरुवारी रात्री मोबाईल हस्तगत करण्यासाठी कृष्ण नदीपात्रात शोध मोहीम राबवण्यात आली. शुक्रवारी सकाळी ही नौकेच्या साह्याने मोबाईलची शोध मोहीम सुरू होती.

८ जानेवारी ला रात्री चोरट्याने पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्षाच्या पाठीमागील दरवाजाचे कुलुप तोडून विविध गुन्हयातील जप्त असलेले तब्बल १८५ मोबाईल चोरून नेले होते,पोलीसांच्या दहा पथकामार्फत चोरीचा तपास सुरु होता.

रेकॉर्डवरील गुन्हेगाराच चोरटा निघाला चार महिन्यापूर्वी पतसंस्थेतील चोरीप्रकरणी अटक करण्यात आली होती.

Web Title: Mobile theft case at Jaisingpur police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.