आमदार उमेश कत्ती यांना लागले आहेत मुख्यमंत्रीपदाचे वेध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 15:49 IST2020-06-23T15:46:46+5:302020-06-23T15:49:07+5:30

मला यापुढे कॅबिनेट मंत्री व्हायचे नाही, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला राज्याची धुरा सांभाळायची आहे. मी उत्तर कर्नाटकाच्या मुख्यमंत्री होण्यास लायक आहे, असा आत्मविश्वास हुक्केरीचे आमदार उमेश कत्ती यांनी व्यक्त केला आहे.

MLA Umesh Katti is looking for the post of Chief Minister! | आमदार उमेश कत्ती यांना लागले आहेत मुख्यमंत्रीपदाचे वेध!

आमदार उमेश कत्ती यांना लागले आहेत मुख्यमंत्रीपदाचे वेध!

ठळक मुद्देआमदार उमेश कत्ती यांना लागले आहेत मुख्यमंत्रीपदाचे वेध!मला आता कॅबिनेट मंत्री पदांमध्ये स्वारस्य नाही : कत्ती

बेळगांव : मला यापुढे कॅबिनेट मंत्री व्हायचे नाही, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला राज्याची धुरा सांभाळायची आहे. मी उत्तर कर्नाटकाच्या मुख्यमंत्री होण्यास लायक आहे, असा आत्मविश्वास हुक्केरीचे आमदार उमेश कत्ती यांनी व्यक्त केला आहे.

हुक्केरी तालुक्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आमदार यांनी उपरोक्त आत्मविश्वास व्यक्त केला. यापूर्वी मी ८ वेळा कर्नाटक विधानसभेमध्ये निवडून गेलो आहे. राज्यातील कॅबिनेट मंत्री पदही बराचदा भुषविले आहे. त्यामुळे मला आता कॅबिनेट मंत्री पदांमध्ये स्वारस्य नाही. राज्याचा सर्वांगीण विकास साधणे हे माझे ध्येय आहे. मी निश्चितपणे मुख्यमंत्री होईन, फक्त आपल्या सर्वांचा आशीर्वाद हवा, असे प्रतिपादन कत्ती यांनी केले आहे.

 

Web Title: MLA Umesh Katti is looking for the post of Chief Minister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.