शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

VidhanSabha Election 2024: 'हात'कणंगलेत एकमेकाला साथ की बंडखोरीने करणार घात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 16:35 IST

आवळे, माने लागले कामाला, स्वाभिमानीही रिंगणात

आयुब मुल्लाखोची : हातकणंगले विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून आमदार राजूबाबा आवळे (काँग्रेस), तर महायुतीकडून अशोकराव माने (जनसुराज्य- भाजप) यांची उमेदवारी पक्की मानली जाते. गेल्या वेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले डॉ. सुजित मिणचेकर हे उद्धवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वैभव कांबळे यांना रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आणि महायुती यांच्यात जोरदार सामना होईल; परंतु मिणचेकर, कांबळे यांची उमेदवारी सगळ्यांचीच धावपळ उडविणारी ठरू शकते.हातकणंगलेत राज्यातील नव्या घडामोडींमुळे राजकारणात समर्थक विरोधक, तर विरोधक समर्थक बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार आवळे यांना तिकीट मिळणारच आहे तरीसुद्धा मिणचेकर यांनी शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडीचे संकेत मिळत आहेत. लोकसभेला खासदार धैर्यशील माने यांना मताधिक्य मिळाल्याने शिंदेसेनेकडून अविनाश बनगे इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे दिसते. शेवटी हे प्रकार निवडणूक पूर्व असल्याने त्याची दखल वरिष्ठ किती घेतात, हे महत्त्वाचे आहे.

स्वाभिमानी गणित बिघडवणारआवळे यांच्या पाठीशी आमदार सतेज पाटील यांची शक्ती आहे. आवळे कुटुंबाला अर्थात काँग्रेसला इथल्या मतदारांनी सतत पाठबळ दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)सोबत असून गतवेळी विरोधात असलेली उद्धवसेना यावेळी बरोबर असेल. विकासकामांच्या पाठबळावर आवळे यांनी गट तयार केला आहे. गतवेळी स्वाभिमानी संघटना सोबत होती. याचा फायदा आवळे यांना झाला होता. यावेळी संघटना स्वतंत्र उमेदवार देणार आहे. त्यामुळे काँग्रेसला इतर मतांची बेरीज करण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.

कागदावर महायुती प्रबळप्रकाश आवाडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या ताराराणी पक्षाचे उमेदवार किरण कांबळे यांनी १९ हजारांहून अधिक मते गत निवडणुकीत घेतली होती. यावेळी त्यांची ताकद महायुतीला मिळणार आहे. त्यातच कोरे, माने, महाडिक, आवाडे, यड्रावकर, राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची ताकद अशोकराव माने यांच्या पाठीशी राहणार आहे.

२०१९ चा निकाल 

  • राजू जयवंतराव आवळे - ७३७२०,
  • डॉ. सुजित मिणचेकर - ६६९५०
  • अशोकराव माने - ४४५६२

सध्याचे मतदान

  • एकूण मतदार - ३,३८,६३३. 
  • पुरुष- १,७२,१३९. 
  • महिला- १,६६,४७५. 
  • इतर -१९.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४hatkanangle-acहातकणंगलेcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीRaju Awaleराजू आवळे