शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

Vidhan Sabha Election 2024: हातकणंगलेत काट्याची तिरंगी लढत, राजू आवळे यांच्यासमोर माने, मिणचेकरांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 18:47 IST

दत्ता बिडकर हातकणंगले : हातकणंगले मतदारसंघात १६ उमेदवार असले तरी मुख्य लढत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे आमदार राजू जयवंतराव आवळे, ...

दत्ता बिडकरहातकणंगले : हातकणंगले मतदारसंघात १६ उमेदवार असले तरी मुख्य लढत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे आमदार राजू जयवंतराव आवळे, महायुती कडून जनसुराज्य पक्षाचे अशोकराव माने आणि परिवर्तन महाशक्ती चे स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून डॉ. सुजित मिणचेकर यांच्यातच सामना रंगणार आहे. जातीय समीकरणे आणि पक्षीय फुटाफुटीच्या राजकारणात सामान्य मतदार कोणाबरोबर राहणार यावरच विजयाचे गणित ठरणार आहे.आमदार राजू आवळे हे गावागावामध्ये केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व उद्धवसेनेचे बळ मिळत आहे. कट्टर शिवसैनिक काय भूमिका घेणार यावरच त्यांचा विजय अवलंबून आहे.महायुतीने जनसुराज्यचे  अशोकराव माने यांना पुन्हा संधी दिली आहे. पराभूत झाल्या पासून त्यांनी गावागावात संपर्क ठेवून पद नसताना कोटयवधीची विकासकामे केली आहेत. भाजपा आणि शिंदेसेनेकडून त्यांना उमेदवारीची गळ घातली होती. मात्र जनसुराज्यचे प्रमुख आमदार विनय कोरे यांनी त्याची उमेदवारी घोषित केल्याने महायुतीच्या नेत्यांना त्यांना पाठिंबा देण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यांच्यामागे शिंदे सेनेचे खासदार धैर्यशिल माने, आमदार प्रकाश आवाडे आणि महाडिक गटाची ताकद आहे.महायुतीचे नेत आणि कार्यकर्ते किती एकसंघपणे काम करणार यावरच त्यांचे यश अवलंबून आहे.परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश करून उमेदवारी घेतली. १० वर्षाच्या आमदारकीचा अनुभव आणि शिवसेना -भिमसेना संघटन जोडीला शेतकरी संघटना यामुळे त्यांनी निवडणूकीत चुरस निर्माण केली आहे. प्रमुख तिरंगी लढत असली तरी डॉ. क्रांती दिलीप सावंत ( वंचित बहुजन आघाडी )गणेश विलास वायकर (रिपलीकन पार्टी ऑफ इंडिया (अे ) अजित कुमार देवमोरे, अशोक तुकाराम माने, वैभव शंकर कांबळे, असे इतर तेरा प्रमुख उमेदवार कोणाची किती मते खाणार यावरच विजयाचे गणित ठरणार आहे.

काही बेरजी, काही वजाबाकी

२०१९च्या निवडणुकीत स्वाभिमानीचा पाठिंबा, आणि महाडिक गटाची ताकद काँग्रेस उमेदवाराला होता. यावेळी स्वाभिमानीचा उमेदवार रिंगणात आहे. तर महाडीक गट उघड जनसुराज्य बरोबर असल्याने कॉग्रेस उमेदवाराला ही तुट भरून काढावी लागणार आहे. पण यावेळी उद्धवसेना, राष्ट्रवादी राजू आवळेंसोबत असल्याने काँग्रेसची ताकद देखील वाढली आहे.जनसुराज्यला आवडेंची शक्ती२०१९ च्या निवडणूकीत आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्षाने स्वंतत्र उमेदवार दिला होता. या वेळी त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश करून महायुतीला पाठिंबा दिला आहे. ही जनसुराज्य ची जमेची बाजू आहे.

  • एकूण मतदान - ३४१६८५
  • पुरुष - १७३४४९
  • महिला - १६८२१६
  • इतर - २०
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४hatkanangle-acहातकणंगलेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024