अमन मित्तल यांचे पहिल्यांदा फिल्डवर काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 20:28 IST2019-08-14T20:27:00+5:302019-08-14T20:28:51+5:30
फिल्डवर जाण्यात स्वारस्य असणाऱ्या मित्तल यांना जिल्हाधिकारी कार्यालयच झेडपीमध्ये आल्याने तेथेच ठाण मांडावे लागले.

अमन मित्तल यांचे पहिल्यांदा फिल्डवर काम
ठळक मुद्देमहापुरात धावून आलेले ‘देवदूत’जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार विविध कारणांनी बाहेर जावे लागत असल्याने मित्तल हे झेडपीतच ठाण मांडून आहेत.
अमन मित्तल यांनी महापूर येण्याआधी ट्रॅक्टरवरून जाऊन आंबेवाडीच्या ग्रामस्थांना बाहेर पडण्याची विनंती केली होती. फिल्डवर जाण्यात स्वारस्य असणाऱ्या मित्तल यांना जिल्हाधिकारी कार्यालयच झेडपीमध्ये आल्याने तेथेच ठाण मांडावे लागले.
आपल्याच कॅम्पसमधून आपत्कालीन यंत्रणा राबविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार विविध कारणांनी बाहेर जावे लागत असल्याने मित्तल हे झेडपीतच ठाण मांडून आहेत. सकाळी आठ-साडेआठला आल्यानंतर रात्री ११ पर्यंत समोर येईल त्या प्रश्नाचा निपटारा केला आहे.