शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

चंद्राच्या पुढे जाणे हा चांद्रयान मोहिमेचा उद्देश -धनेश बोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 12:44 AM

देशप्रेमासाठी अनेकजण आपापल्या परीने काम करीत असतात. तसेच जगामध्ये आपल्या देशाचे नाव उज्ज्वल राहावे, यासाठी नेहमी धडपडणाऱ्या वैज्ञानिक विभागात मी करिअर निवडले. - धनेश सुनील बोरा

ठळक मुद्देचर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

अतुल आंबी ।

चर्चेतील व्यक्तीशी थेट संवादउद्योग, व्यवसाय यासह डॉक्टर, वकील, पोलीस अधिकारी होण्यासाठी अनेक विद्यार्थी व त्यांचे पालक धडपडत असतात. मात्र, या सर्वांपेक्षा वेगळे क्षेत्र निवडून आपला व देशाचा नावलौकिक करता येतो, हे दाखवून देत चांद्रयान ३ मोहिमेत निवड झालेल्या इचलकरंजीतील धनेश बोरा या युवा संशोधकाची घेतलेली मुलाखत.

प्रश्न : या क्षेत्रात तसेच मोहिमेत कसे सहभागी झालात?उत्तर : माझे शिक्षण बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन झाले आहे. त्याचबरोबर रॉकेट सायन्स व सॅटेलाईट कम्युनिकेशनचे कोर्स केले. त्यानंतर इस्रोची परीक्षा दिली. इस्रोचे संचालक डॉ. सतीशराव यांनी अहमदाबाद येथे मुलाखतीतून निवड केली. त्यामुळे देशसेवा करण्याची मला संधी मिळाली.

प्रश्न : चांद्रयान ३ मधील तुमच्यावर नेमकी कोणती जबाबदारी आहे?उत्तर : नोव्हेंबर २०२० साली चांद्रयान ३ चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. त्यामध्ये लागणारे अतिसूक्ष्म उपग्रह व सेन्सर तयार करण्याची जबाबदारी आमच्या टीमवर सोपविण्यात आली आहे. त्यामध्ये अतिशय तंतोतंत काम करणारे व वजनाने अतिशय हलके असे तंत्रज्ञान वापरून उपग्रह तयार करण्यात येणार आहेत. या स्वरूपाचे उपग्रह मंगळावर पोहोचण्यासाठी वापरण्यात आले होते. कमी खर्चात मंगळावर पोहोचणारा भारत हा पहिला एकमेव देश ठरला आहे.

प्रश्न : चांद्रयान ३ चे नेमके काम काय व कसे?उत्तर : चांद्रयान ३ चंद्रावर पोहोचल्यानंतर तेथील माती परीक्षण, पाणी, हवा, जीवसृष्टी कशी असू शकते, याबाबत अभ्यास करून त्याठिकाणी एखादे सेंटर उभारून तेथून पुढील ग्रहांचा अभ्यास करणे हा मूळ उद्देश आहे. त्यामुळे इतर ग्रहांवरील जीवसृष्टी, पाणी, हवामान, त्यांचे सूत्र काय आहे, याचा शोध घेणे, अभ्यास करणे सोपे होणार आहे.‘रोबो रायटर’चा निर्माताधनेश यांची रोबो रायटरचा निर्माता अशीही वेगळी ओळख आहे. सध्या कोल्हापुरात त्या रोबोमध्ये प्रगती व निर्मिती सुरू आहे. त्याचाही अनेकांना लाभ होणार आहे. धनेश बोरा या युवा उद्योजकांना अनेक राष्टÑीय, आंतरराष्टÑीय व स्थानिक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये रशियन फेडरेशन, रोटरी क्लब, नॅशनल अंध संस्था, शिवम, गुरूदेव सेवा मंडळ अशा अनेक संस्थांचा समावेश आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर