शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

Kolhapur: राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षाच्या नावे फेक अकाउंटवरुन तरुणींशी गैरकृत्य, एकजण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 13:47 IST

मुरगूड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांच्या नावाने इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट काढल्याप्रकरणी करनूर ( ता. कागल) येथील ...

मुरगूड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांच्या नावाने इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट काढल्याप्रकरणी करनूर ( ता. कागल) येथील एका तरुणाला मुरगूड पोलिसांनी अटक केली. या अकाउंटवरून या तरुणाने अनेक तरुणींशी शीतल फराकटे यांच्या नावाने चॅटिंग करून गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला आहे. एका तरुणीच्या सजगतेने या भामट्याचा पर्दाफाश झाला आहे. तोहिद शेख (वय २६), रा. करनूर, असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांना एका तरुणीचा फोन आला होता. त्या तरुणीने तुम्ही दुसऱ्या तरुणाशी मला बोलावयास कसे सांगता असा जाब विचारला. यावेळी फराकटे गोंधळल्या, त्यांनी त्या तरुणीची विचारपूस करून सर्व माहिती समजून घेतली. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. इन्स्टाग्रामवरून तुम्हीच मला दुसऱ्या मुलाशी बोलण्यास सांगत आहात, त्याचा फोन नंबर देत आहात हे चुकीचे असल्याचे सांगितले. त्यानंतर शीतल फराकटे यांना आपले इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट असण्याची शंका आली.त्यानंतर शीतल फराकटे यांनी आपले कार्यकर्ते व कुटुंबीयांच्या मदतीने फेक अकाउंट उघडणाऱ्या तोहिद शेखची माहिती घेतली. सोमवारी दुपारी त्यांनी मुरगूड पोलिस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तोहीदला फोन करण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा फोन बंद लागत होता. दरम्यान, त्यानेच एक व्हिडीओ तयार करून आपण शीतल फराकटे यांचे फेक अकाउंट तयार केल्याचे कबूल करून आपण त्यांची माफी मागण्यास तयार असल्याचे सांगितले. संध्याकाळी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंद केला.

दरम्यान, तोहीदने फेक अकाउंटवरून पाठवलेला मजकूर डिलिट करून टाकला; पण याच अकाउंटवरून सातशे फॉलोअर केले असून, यातील अनेकांना शीतल फराकटे या नावाने त्याने संदेश पाठवले असणार, शिवाय अन्य काही मुलींच्या नावानेही फेक अकाउंट तयार करून गैरकृत्य केल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांनी याचा सखोल तपास करून कडक कारवाई करावी, अन्य कोणी दोषी असल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी फराकटे समर्थकांनी केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcyber crimeसायबर क्राइमNCPराष्ट्रवादी काँग्रेसSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिस