शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीसाठी घटक पक्षांनी तुटेपर्यंत ताणू नये, मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी इचलकरंजी महापालिका निवडणुकीचा घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 18:09 IST

इचलकरंजी : महापालिका निवडणुकीसाठी महायुती करण्यासाठी चर्चा सुरू आहे. घटक पक्षांनी आपली ताकद जिथे आहे, अशाच ठिकाणी उमेदवारी मागणी ...

इचलकरंजी : महापालिका निवडणुकीसाठी महायुती करण्यासाठी चर्चा सुरू आहे. घटक पक्षांनी आपली ताकद जिथे आहे, अशाच ठिकाणी उमेदवारी मागणी करावी. तुटेपर्यंत ताणू नये, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी म्हणून जबाबदारी भाेसले यांच्याकडे आहे. त्यासाठी ते इचलकरंजीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महापालिकेच्या ६५ जागांसाठी भाजपकडे ४२९ इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. त्यातून भाजपवरील विश्वास दिसून येतो. माझ्याकडे या मतदारसंघाची जबाबदारी देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इचलकरंजीत आपली ताकद आहे, ती योग्य नियोजनाने वापरावी. त्यानुसार कामकाज चालणार असून, अंतिम यादीबाबत वरिष्ठ पातळीवरूनच निर्णय होईल. तरीही सक्रिय कार्यकर्त्यांची दखल घेतली जाईल. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांना अन्य ठिकाणी संधी दिली जाईल. भाजपची सत्ता येण्यासाठी सर्वांनी ताकदीने प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.यावेळी आमदार राहुल आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मकरंद देशपांडे, राजवर्धन नाईक-निंबाळकर, शशिकांत मोहिते, सुनील पाटील, शहाजी भोसले आदी उपस्थित होते.

शिवतीर्थ, शंभूतीर्थाला भेटशिवेंद्रराजे यांनी इचलकरंजी शहरात आल्यानंतर सुरुवातीला शिवतीर्थ आणि शंभूतीर्थ येथे भेट दिली. दोन्ही ठिकाणे सुसज्ज असून, येथे भेट दिल्यानंतर अभिमान वाटतो, असे सांगितले.निष्ठावंतांना न्याय देण्यासाठी प्रयत्नदोन नगरसेवक असल्यापासून भाजपसोबत असलेल्या निष्ठावंतांनाही न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. निवडून येण्याची क्षमता आहे, अशांना अन्य आवश्यक सर्व ताकद देऊन निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले.

रात्री उशिरापर्यंत मुलाखतीपहिल्या दिवशी मंगळवारी ८ आणि बुधवारी ८ असे १६ प्रभागांतील मुलाखतींचे नियोजन होते. त्याप्रमाणे बुधवारी रात्री उशिरापर्यंत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. याबाबत नियोजन समितीसह वरिष्ठांच्या निर्णयानुसार उमेदवारी घोषित केली जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shivendraraje Bhosale reviews Ichalkaranji election, urges alliance unity.

Web Summary : Minister Shivendraraje Bhosale urged alliance parties to be reasonable in seat demands for Ichalkaranji Municipal Corporation elections. BJP prioritizes loyalists and aims for victory with strategic planning and senior-level decisions. He visited Shivtirth and Shambhutirth, praising their upkeep.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Shivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेMahayutiमहायुतीBJPभाजपा