मंत्री सामंत यांनी घेतला मंत्रालय @ कोल्हापूरचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 10:54 IST2021-02-10T10:53:02+5:302021-02-10T10:54:46+5:30

Uday Samant Shivaji University kolhapur-गेल्या महिन्यात शिवाजी विद्यापीठात घेण्यात आलेल्या मंत्रालय @ कोल्हापूर उपक्रमातील प्रलंबित प्रकरणांचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन आढावा घेतला.

Minister Samant reviews Ministry @ Kolhapur | मंत्री सामंत यांनी घेतला मंत्रालय @ कोल्हापूरचा आढावा

मंत्री सामंत यांनी घेतला मंत्रालय @ कोल्हापूरचा आढावा

ठळक मुद्देमंत्री सामंत यांनी घेतला मंत्रालय @ कोल्हापूरचा आढावा उपक्रमामध्ये विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ३०३४ प्रकरणांची निर्गत

 कोल्हापूर : गेल्या महिन्यात शिवाजी विद्यापीठात घेण्यात आलेल्या मंत्रालय @ कोल्हापूर उपक्रमातील प्रलंबित प्रकरणांचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन आढावा घेतला.

या उपक्रमामध्ये विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांच्याशी संबंधित ३०३४ प्रकरणांची निर्गत करण्यात आली. काही प्रकरणे प्रलंबित होती. त्यांवर विद्यापीठ प्रशासन आणि उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून काय कार्यवाही सुरू आहे याबाबतचा आढावा मंत्री सामंत यांनी घेतला.

प्रलंबित प्रकरणांची लवकरात लवकर निर्गत करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. विद्यापीठाशी संबंधित असणाऱ्या काही प्रकरणांची निर्गत झाली आहे. उर्वरित प्रकरणे लवकरच मार्गी लावली जातील, असे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सांगितले. या बैठकीस उच्च शिक्षण विभागाचे मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: Minister Samant reviews Ministry @ Kolhapur