मंत्री  हसन मुश्रीफ यांना खर्डा-भाकर देऊन ओवाळणी 

By विश्वास पाटील | Updated: November 15, 2023 10:44 IST2023-11-15T10:44:11+5:302023-11-15T10:44:43+5:30

भाऊबीजनिम्मित्त स्वाभिमानी महिला आघाडीच्यावतीने आमदार, खासदार लोकप्रतिनिधींना खर्डा भाकरी देऊन ओवाळणी करण्यात आली.

Minister Hasan Mushrif was waved by giving a piece of bread | मंत्री  हसन मुश्रीफ यांना खर्डा-भाकर देऊन ओवाळणी 

मंत्री  हसन मुश्रीफ यांना खर्डा-भाकर देऊन ओवाळणी 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना कागल तालुक्यातील महिलांनी खर्डा भाकरी देऊन ओवाळणी केली.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकार व कारखानदारांनी वा-यावर सोडले आहे. आंदोलनात तोडगा न काढल्याने  व शेतकऱ्यांची दिवाळी रस्त्यावर गेली, यामुळे दिपावली भाऊबीजनिम्मित्त स्वाभिमानी महिला आघाडीच्यावतीने आमदार, खासदार लोकप्रतिनिधींना खर्डा भाकरी देऊन ओवाळणी करण्यात आली.

दरम्यान, ऊस दराचा तोडगा न निघाल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविल्या प्रकरणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना जयसिंगपूर पोलिसांकडून अटक केली आहे. त्यांना जामिनासाठी बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सागर शंभुशेटे, संपर्कप्रमुख भिमगोंडा पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते अटकेत आहेत.

Web Title: Minister Hasan Mushrif was waved by giving a piece of bread