शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रभू रामचंद्र ने मुझे बुलाया है !, वाढदिवसा निमित्ताने मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले रामल्ललांचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 16:01 IST

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा सोमवारी (दि. २४) वाढदिवस, या निमित्ताने त्यांनी अयोध्येत जाऊन रामल्ललांचे दर्शन घेतले. ...

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा सोमवारी (दि. २४) वाढदिवस, या निमित्ताने त्यांनी अयोध्येत जाऊन रामल्ललांचे दर्शन घेतले. मंत्री मुश्रीफ हे तिथीनुसारच रामनवमीलाच वाढदिवस साजरा करतात. तसेच त्यांनी ५- मराठा बटालियनच्या वर्धापन दिन कार्यक्रमालाही उपस्थिती लावली. कागल तालुक्यातील साके येथील रहिवासी असलेले व ऑनररी लेफ्टनंट पदावर काम करीत असलेल्या संतोष चौगुले यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.अयोध्या नगरीत ५- मराठा बटालियन इन्फंट्रीचे युनिट तैनात आहे. सोमवारी बटालियनचा २२५वा वर्धापन दिन होता, या वर्धापन दिनाला उपस्थिती रहावे म्हणून संतोष चौगुले यांनी मंत्री मुश्रीफ यांना आग्रह केला होता. यावेळी कर्नल जगदाळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ पुतळा भेट देऊन मंत्री मुश्रीफ यांचा बटालियनच्या वतीने सत्कार केला. यावेळी ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने, प्रकाश गाडेकर, प्रवीण काळबर, बाळासाहेब तुरंबे उपस्थित होते.

कृतज्ञता सैनिकांची..!मुश्रीफ ग्रामविकासमंत्री म्हणून कार्यरत असताना आजी-माजी सैनिकांसाठी केलेली मालमत्ता कराची सूट तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना केलेली मदत आणि शहीद जवानांची स्मारके व स्मृती कमानी याबद्दल सैनिकांनी कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या.

प्रभू रामचंद्र ने मुझे बुलाया है..!मंत्री मुश्रीफ म्हणाले, प्रभू श्री. रामचंद्रांनी मला अयोध्येला बोलावल्याशिवाय असा योगायोग घडून येणे शक्यच नाही. माझा तारखेनुसार येणारा २४ मार्च हा वाढदिवस, ५ - मराठा बटालियन इन्फंट्रीचा वर्धापन दिन आणि प्रभू श्री. रामचंद्रांची राजधानी अयोध्यानगरी हा सर्वच एक मोठा योगायोग आहे. त्यामुळेच ‘प्रभू श्री रामचंद्राने मुझे बुलाया है...’ या भावनेतून मी अयोध्येत पोहोचलो.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या