एसटी प्रश्नी पवारांनी भाग घेतला म्हणून भाजपच्या पोटात का दुखत, मंत्री हसन मुश्रीफांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2022 16:59 IST2022-01-14T16:52:01+5:302022-01-14T16:59:54+5:30
एस. टी. कर्मचारी युनियन आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे जुने सबंध

एसटी प्रश्नी पवारांनी भाग घेतला म्हणून भाजपच्या पोटात का दुखत, मंत्री हसन मुश्रीफांचा सवाल
कोल्हापूर : एस. टी. कर्मचारी युनियन आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे जुने सबंध आहेत. राज्यात एखादा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यामध्ये त्यांनी भाग घेतला म्हणून भाजपच्या पोटात का दुखत आहे. असा सवाल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत असतानाही त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
शरद पवार हे राज्याचे सॅडो मुख्यमंत्री असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे तीन महिने प्रवासांचे हाल होत आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी मध्यस्थी केली म्हणून बिघडले कोठे? पवार यांच्यामुळेच महाविकास आघाडी आकारास आली आणि भाजपची सत्तेचे स्वप्न भंगले यामुळेच ते अस्वस्थ आहेत.
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब हे शरद पवार यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जात आहेत. या चर्चेतून मार्ग निघत आहे. अशावेळी पवार – परब यांच्यात होणाऱ्या चर्चेमुळे चंद्रकांत पाटील यांच्या पोटात का दुखते?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत, शरद पवार यांच्यामुळे महाविकासआघाडी घट्ट राहिल्याचे दुःख चंद्रकांत पाटील यांना असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटले.