शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मुश्रीफ-समरजित घाटगेंनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, भाजपा प्रवेशाची पुन्हा चर्चा रंगली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 17:09 IST

नगरपालिका निवडणुकीत मंत्री मुश्रीफ व घाटगे हे दहा वर्षाचा राजकीय संघर्ष विसरून एकत्र आले

कागल : कागल नगरपरिषद निवडणुकीत एकतर्फी विजय संपादन केल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहु ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी मुंबईत भेट घेतली. या नगरपालिका निवडणुकीत मंत्री मुश्रीफ व घाटगे हे दहा वर्षाचा राजकीय संघर्ष विसरून एकत्र आले. आम्हाला एकत्र आणण्यात एक अदृश्य शक्ती असल्याचे दोघांनी जाहीर केले होते. ही अदृष्य शक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस असल्याचे सांगितले जात होते.नगरपालिका निवडणुकीत प्रचार सभेत या दोन्ही नेत्यांनी आमची युती घडवून आणण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांचा पुढाकार असून आमच्या युतीला भरघोस मतांनी विजयी करा. म्हणजे निकालानंतर ताट मानेने आम्ही त्यांच्या भेटीला जाऊ, असे सांगितले होते. सोमवारी सायंकाळी मंत्री मुश्रीफ नेहमीप्रमाणे मुंबईला रवाना झाले तर मंगळवारी घाटगे मुंबईला गेले आहेत. कागल नगरपालिका निवडणुकीत मुश्रीफ - घाटगे युतीने नगराध्यक्षपदासह सर्व 23 जागा जिंकल्या आहेत. गडहिंग्लज व कागल या मोठ्या नगरपालिकात राष्ट्रवादी (अजित पवार) ची सत्ता आली आहे.भाजपा प्रवेशाची पुन्हा चर्चाया दोघांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची एकत्रित भेट घेतली आहे. समरजित घाटगे हे भाजपामध्ये प्रवेश करणार याच्या चर्चा गेली सहा महिने सुरू असून या भेटीने पुन्हा एकदा या पक्षप्रवेशाच्या विषयाकडे लक्ष वेधले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mushrif-Ghatge meet CM, Deputy CM; BJP entry rumors resurface.

Web Summary : Hasan Mushrif and Samarjit Ghatge met Fadnavis and Pawar after a sweeping victory in the Kagal Nagar Parishad election. Their alliance, facilitated by Fadnavis, fueled speculation about Ghatge's potential BJP entry, which has been circulating for months.